
कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी फॅक्टरी येथील चित्रकार आसिफ शरीफ शेख आणि वांबोरी येथील शिल्पकार योगेश देविदास लोखंडे या कलावंतांचे सामूहिक चित्र व शिल्प प्रदर्शन वरळी मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मध्ये दि 20 सप्टेंबर पासून 26 सप्टेंबर या कालावधीत सुरु असलेल्या FOUR या शिर्षकावर आधारित असलेल्या कला प्रदर्शना मध्ये भायखळा ( मुंबई ) येथील आमदार मा.यामिनी जाधव यांनी प्रदर्शनात उपस्थिती देऊन आसिफ आणि योगेश यांचे मनसोक्त कौतुक केले आणि पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
