
कोपरगाव प्रतिनिधी:-
संघर्ष तरुण मंडळाच्या वतिने गणेशोत्सव निमित्त्य संस्थापक कै. सुनील श्रावण लोखंडे यांच्या पूण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असुन संघर्ष तरुण मंडळाने आदर्श असा हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे समाजाला प्रेरणा मिळत आहे. संघर्ष तरुण मंडळ दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते.


संघर्ष तरुण मंडळ आयोजित संस्थापक कै. सुनील श्रावण लोखंडे यांच्या पूण्यस्मारनार्थ रक्तदान शिबिर उत्सुर्त प्रतिसाद मिळाला आहे.



या रक्तदान शिबिराचे उदघाटन दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी राघवेश्वरानंदगिरी महाराज उर्फ उंडे महाराज यांच्या हस्ते झाले. या शिबिरात प्रवीण पाटील , विशाल कुमावत, राजेश जाधव,विशाल लोखंडे, पांडुरंग बोराडे,अतुल पाटील, सचिन लासुरे, शेरखान पठाण, नंदलाल जयस्वाल ,जुनेदभाई शेख, रवींद्र कथले, उमेश हिवाळे, रुपेश चौधरी, निरूपम जोशी, अविनाश जाधव,विकी भावसार, अतिष तनपुरे, आकाश कानडे,अमोल गुंजाळ यांनी स्वयपुर्तीने रक्तदान केले आहे.या शिबिरास मंडळाचे सर्व सदस्य व भागातील नागरिक उपस्तीत होते.त्याच बरोबर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये लहान गट प्रथम क्रमाक अंजली शार्दुल,व्दितिय ज्ञानेश्वरी हिवाळे,तृतीय क्रमाक समृद्धी फरताळे,उत्तेजाणार्थ गौरी शार्दुल तसे मोठ्या गटात प्रथम क्रमांक सौ.निता पाटील,व्दितीय सौ.अर्चना औताडे,तृतीय क्रमांक सौ.छाया फरताळे उत्तेजणार्थ गायत्रि दिघे,उत्तेजणार्थ मानसी निकुंभ रांगोळी स्पर्धेत उत्तीर्ण झाले


असुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. परिक्षक.म्हणुन श्रीमान
गोकुळचंदजी विद्यालय कोपरगावचे श्री.अमृतकर ए.बी. सर यांनी कामकाज पाहिले.
राजेंद्र लोखंडे, तुषार पाटील, विशाल लोखंडे, तुषार पोटे, प्रवीण पाटील, विशाल कुमावत, अतुल पाटील, संतोष जाधव, राजेश जाधव, पांडुरंग बोराडे,सचिन लासुरे, विनायक व्यवहारे, अक्षय वाघ, पीयूष कदम, उमेश हिवाळे, अभिषेक वायखिंडे, शुभम लासुरे, शुभम वढणे, धीरज शिवरकर, नवनाथ दिघे, पुष्कळ मुन्शी, इंद्रजित लोखंडे, चैतन्य जाधव आदि मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेवुन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे.
