सर्वोच्च मानांकनामुळे आयटी विभागाच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब…
कोपरगांव प्रतिनिधी:-
नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन, नवी दिल्ली (एनबीए-राष्ट्रीय मान्यता मंडळ) या भारत सरकारच्या स्वायत्त संस्थेने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीनुसार इन्फर्मेशन टेक्नालाॅजी (आयटी) विभागाने सादर केलेल्या कम्प्लायन्स रिपोर्टचे (अनुपालन अहवाल) मुल्यांकन करून अगोदर प्राप्त असलेल्या मानांकनाला गृहीत धरून पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन जुन २०२५ पर्यंत दिले आहे. या सर्वोच्च मानांकनामुळे आयटी विभागाच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की आयटी विभागास पहिल्यांदा २०१३ मध्ये एनबीएचे मानांकन प्राप्त झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये तीन वर्षांसाठी मानांकन मिळाले. सदर मिळालेल्या मानांकनांची मुदत वाढ मिळावी, यासाठी अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अनुपालन अहवालाचे एनबीएने नियुक्त केलेल्या समितीने मुल्यांकन करून पुन्हा तीन वर्षांचे मानांकन बहाल केले आहे. अशा प्रकारचे सलग सहा वर्षांचे म्हणजे २०२५ पर्यंत एनबीए मानांकन प्राप्त असलेला संजीवनीचा आयटी विभाग हा अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधुन एकमेव आहे. तसेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इतरही पात्र शाखा एनबीए मानांकित आहेत.
एनबीए समितीने येथिल आयटी विभागाचे उत्कृष्ट अध्ययन-अध्यापन, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरची (पायाभूत सुविधा) उपलब्धता, उच्च व अनुभवी प्राद्यापक वर्ग असा विशेष शेरा दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आयटी विभाग कार्यरत असुन यातील फक्त चार आयटी विभागांना सलग सहा वर्षांचे एनबीए मानांकन प्राप्त आहे. यात संजीवनीच्या आयटी विभागाचा समावेश आहे, ही बाब ग्रामिण भागाच्या दृष्टीने भुषणावह आहे. विध्यार्थी व पालकांच्या मागणी नुसार आता आयटी विभागाची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन प्रवेश क्षमता ६० वरून १२० करण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासुन एम. टेक. (सायबर सिक्युरीटी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला असुन विध्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी संजीवनीच्या आयटी विभागाच्या उपलब्धीबाबत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व आयटी विभाग प्रमुख डाॅ. माधुरी जावळे, सर्व प्राद्यापक व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागास एनबीए मानांकन प्राप्त झाल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी विभाग प्रमुख डाॅ. माधुरी जावळे यांचा सत्कार केला. यावेळी डाॅ. ठाकुर उपस्थित होते.
