यंदाची कोपरगाव शिवसेनेची दहीहंडी रद्द:- जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावात अतिशय नावाजलेली व मानाची दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली कोपरगाव शिवसेनेची दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे.
कोपरगाव शिवसेनेचे मा.शहरप्रमुख स्व.धर्मवीर काका शेखो यांचे बंधू कै.बिंदरसिंग शेखो यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कोपरगाव शिवसेनेवर शोककळा पसरली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी होणारी शिवसेनेची मानाची दहीहंडी यंदा रद्द करण्याचा निर्णय कोपरगाव शिवसेनेच्या दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *