डॉ रामदास आव्हाड यांचे उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशाचा “७५ वा स्वातंत्र्य दिन” अमृत महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संघटन समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आयुर्वेदाचार्य डॉ.श्री रामदास आव्हाड सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ रामदास आव्हाड यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


शारदा संकुलातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्तम कवायत संचालन करीत ध्वजाला मानवंदना दिली.विद्यार्थ्यांनी ढोल, झांज,ताशाच्या वाद्यात अतिशय लयबद्ध व जोशपूर्ण कवायतीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
पूर्व प्राथमिक विभागाच्या बालचिमुरड्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीत सादर करून वातावरण देशप्रेममय केले.तसेच
माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या अनुक्रमे मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी भाषणांनी श्रोता वर्ग भारावून गेला.
प्रमुख पाहुणे डॉ.श्री.रामदास आव्हाड सर यांनी विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर पारितोषिकही दिले.
उच्च शिक्षण घेऊन भावी काळात मातृभूमीची व देशवासियांची सेवा करा असा अनमोल संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.


सदर प्रसंगी श्री.दिनेश गुप्ता सर,
श्री.शिरोळे सर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.शार्दुल देव सर, सैन्य दलातील माजी अधिकारी श्री.साबळे सर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अंती देश प्रेमाची ज्योत विद्यार्थ्यांमध्ये सदैव तेवत राहावी यासाठी माननीय प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *