कोपरगाव पिपल्स बँकेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव पिपल्स बँकेमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात व आनंदाच्या वातावरणातD साजरा करण्यात येऊन ध्वजारोहण बँकेचे विद्यमान संचालक श्री सुनिल दत्तात्रय कंगले व श्री सुनिल शांतिलाल बंब यांच्या हस्ते करण्यात आले,ध्वजारोहणाच्या पश्चात बँकेने सामाजिक बांधीलकी जपत पंचक्रोशीतील विविध शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केली, तसेच इयत्ता दहावी, बारावी, पदवी व इतर विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित बँकेच्या मा. संचालक व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला, सदर प्रसंगी बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रतिभा शिलेदार व ज्येष्ठ संचालक श्री कैलासचंद भागचंद ठोळे यांनी मनोगत व्यक्त केले, व शिक्षिका सौ. गोरडे मॅडम व सौ. गवांदे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रतिभा शिलेदार, ज्येष्ठ संचालक श्री कैलासचंद भागचंद ठोळे, श्री सुनिल दत्तात्रय कंगले, श्री कल्पेश जयंतीलाल शहा, श्री सुनिल शांतिलाल बंब, श्री हेमंत भास्करराव बोरावके, श्री धरमकुमार माणकलाल बागरेचा, गौतम बँकेचे संचालक श्री सुनिल शिलेदार, सेवक संचालक श्री विरेश बाळकृष्ण पैठणकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिपक मुकुंद एकबोटे, वरिष्ठ अधिकारी श्री विठ्ठल हरिभाऊ रोठे, बँकेचे सर्व सेवक वर्ग, विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट जनरल मॅनेजर श्री जितेंद्र छाजेड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *