
कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS), नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव, व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षापासून कोविड महामारीने सर्वांना ग्रासले असतांना लसीकरण हे संजीवनी वरदान ठरलेले आहे. या दृष्टीने महाविद्यालयात लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ वर्षांपुढील सर्वांना कोविशील्ड व कोव्हक्सीन या लसीचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस देण्यात आला. या लसीकरण शिबीराचे उदघाटन कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त संदीपराव रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या लसीकरण शिबीरात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी अशा एकूण १४० पेक्षा अधिक सेवकांनी याचा लाभ घेतला आहे. यावेळी एम. जी. व्ही. एस. च्या तालुका समन्वयक श्रीमती अश्विनी बागुल, प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव येथील अयोग्य सेविका श्रीमती नंदू नवले, श्रीमती रोहिणी नाईक, स्वाती सुपेकर, सुवर्णा वायखिंडे, डाटा ऑपरेटर कृष्णा राक्षे हे उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बी. एस. गायकवाड, प्रो. के. एल. गिरमकर, डॉ. जी. डी. देशमुख, डॉ. व्ही. सी. ठाणगे, प्रा. बी. आर. सोनवणे, डॉ. संजय दवंगे यांनी केले.
