
कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
देवळाली प्रवरा येथील थोर समाजसेवक फ्रान्सिस वामन संसारे यांचे चिरंजीव स्वप्नील संसारे यांच्या सुप्रीम टायगर फिटनेस अरिना चा आज देवळाली प्रवरा येथील कुंभार गल्ली येथे श्री त्रिंबकराज पायी दिंडी चे सितारामभाऊ ढुस यांचे अध्यक्षतेखाली व मिस्टर इंडिया, मिस्टर आशिया, गोल्ड मेडलिस्ट मा. जुबेर शेख यांचे हस्ते भव्य उद्घाटन समारंभ पार पडला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस बोलत होते.

प्रसंगी माजी सनदी अधिकारी तथा श्री समर्थ बाबुराव पा. महाराज पाई दिंडी चे दत्ता कडू पाटील, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, देवळाली प्रवरा ओम शांती केंद्राच्या संचालिका विजया बहेनजी, विस्वास कडू, सौ व श्री फ्रान्सिस संसारे, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे, पत्रकार रफिक शेख, ह भ प संपत महाराज जाधव, स्वप्नील संसारे, प्रसाद संसारे यांचेसह असंख्य युवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, देवळाली प्रवरा शहरात अद्यावत जिम उभारून येथील तरुणाईला शरीर संपदा कमविणेची संधी दिले बद्दल स्वप्नील संसारे यांचे हार्दिक आभार, देवळाली शहरात खेळाच्या बाबतीत असलेल्या राजकीय उदासीनतेमुळे माझ्या नगरपालिका असलेल्या शहरातील तरुणांना शेजारच्या ग्रामपंचायत असलेल्या गावात व्यायामाला जावे लागते ही बाब अत्यंत खेदजनक वाटते, मला जेंव्हा माझे नऊ राष्ट्रिय विक्रम, देशाला एक सुवर्ण एक रजत व दोन कांस्य पदकांचे रहस्य विचारले जाते तेंव्हा मी आवर्जून व्यायामशाळेत सात ते आठ वर्षे घेतलेला अनुभव व मिळविलेली शरीर संपदा बद्दल सांगत असल्याचे ढुस यांनी सांगितले. ढुस पुढे म्हणाले की, देवळाली प्रवरा मध्ये अश्या अद्यावत जिमची कमी स्वप्नील संसारे संसारे यांनी भरून काढली असून त्यामुळे येथील तरुण घडण्यास मदत होणार असून देवळाली च्या वैभवात भर पडल्याबद्दल स्वप्नील संसारे परिवाराचे हार्दिक आभार.

माजी सनदी अधिकारी दत्ता कडु पाटील यांनी त्यांच्या शुभेच्छा भाषणात सांगितले की, संसारे कुटुंबाने उभारलेल्या या अद्यावत जिम मुळे येथील तरुणाई व्यसनापासून दूर राहण्यास मदत होणार असून मी जेंव्हा क्रीडा मंत्रालयात काम पाहत होतो तेंव्हा गावाला 16 स्टेशन मल्टी जिम ला मंजुरी देणेचे भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान वाटतो पण त्याच जिमच्या उदघाटणाला मला तत्कालीन राजकीय मंडळींनी बोलावले नाही याची खंतही कडू यांनी बोलून दाखवली.
पुढे बोलताना कडू पाटील म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी संपत्ती, तंदुरूस्ती न् तुमचे चारित्र्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे. काहींच्या मते चारित्र्य सर्वोच्च नसुन तंदुरुस्ती महत्वाची आहे. मुळात न पटणारा हा बदल आहे. चारित्र्याचा विचार न केल्याने अनेक चारित्र्यहीन माणसांचे उदारीकरण झाल्याने समाजाची तंदुरूस्ती बिघडली आहे हे सत्य आहे. बलवान माणसे चारित्र्यवान असतीलच याची हमी देता येणार नाही. परंतु चारित्र्यवान माणसांमध्ये नीतीचे असलेले बळ त्याला मजबुत बनवत असते. मुळात चारित्र्यहीन माणसांचे समाजात उदात्तीकरण होता कामा नये. या मतांवर आम्ही कायम ठाम राहिलो आहोत.
सीतारामभाऊ ढुस यांनी बोलताना सांगितले की, फ्रान्सिस संसारे यांनी त्यांचे आयुष्यात दाणधर्माचे पुण्य कर्म केले, आणि आज त्यांची मुलेही या व्यायाम शाळेच्या माध्यमातून देवळालीतील तरुणांच्या मदतीला धावले त्याबद्दल त्यांचे आभार व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
ओम शांती केंद्राच्या संचालिका विजया बहेनजी यांनी शुभेच्छा देतांना सांगितले की, ओम शांती केंद्राच्या इमारती मधेच वरच्या मजल्यावर जिम उभारल्यामुळे तेथे शारीरिक तंदुरुस्ती व खाली आल्यावर ओम शांती केंद्रात मनाची तंदुरुस्ती मिळणार असल्याने या इमारतीला आरोग्य मंदिराचेच स्वरूप त्यामूळे प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रफीकभाई शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संपत महाराज जाधव यांनी केले.
