कोपरगाव प्रतिनिधी
(राहाता):-
येथील नाद संगीत विद्यालयातील बाल कलाकार विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वतः भक्ती गीते गाऊन आपल्या गुरूप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करीत आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे नाशिक येथील शंकर गोराडे, भजन गायक बाबासाहेब शिंदे, सुरेश चव्हाण, राजेश कासार, जयकुमार पवार तसेच विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले.
याप्रसंगी शंकर गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी ख्याल गायकीमध्ये यमन रागात शास्त्रीय गायन केले. तसेच त्यानंतर स्वरगंगेच्या काठावरती ही रचना सादर केली. भजन गायक बाबासाहेब शिंदे यांनी गुरु परमात्मा परेशु, तसेच माझे माहेर पंढरी या भजन अभंग वाणीने विद्यार्थ्यांना व पालकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर विद्यालयातील बाल कलाकार विद्यार्थ्यांचे गायन वादन संपन्न झाले. यामध्ये श्रावणी निलेश संत, यथार्थ कैलास तिवारी, स्वाती बबन सुरभैय्या, भक्ती शिंदे, समीक्षा नेवगे, यश भड, साहिल क्षीरसागर, राघव पाटील, साई शिंदे, वैष्णवी टेके, कीर्ती निमसे यांनी विविध भक्तीगीत, भजन, अभंगाचे जोरदार सादरीकरण करण केले. प्राची निमसे हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांनी पसायदान, सर्वात्मका सर्वेश्वरा हे नाट्यगीत तसेच आषाढी वारीचे औचित्य साधून अवघे गरजे पंढरपुर, पायी शिर्डीला येतो साईनाथा, हेची दान देगा देवा या भैरवी रागातील रचना सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. सूत्रसंचालन किर्ती निमसे हिने केले.
या प्रसंगी विलास गोंडे, निलेश चव्हाण, स्वप्निल डोके, भास्कर सदाफळ, नारायण शिंदे, नीता निमसे, सविता निमसे, निर्माला तिवारी, पायल गोंडे, ज्योती क्षीरसागर, शोभा चव्हाण, हिना नाकरांनी, वैशाली संत, रंजना पवार, प्रीती पवार, रंजना जाधव यांच्यासह कृष्णा कासार, आलोक संत, भव्य नाकरांनी, संकेत काळोखे, तन्मय पेंडभाजे, पियुष पवार , राजलक्ष्मी कासार, देवयानी गाढवे, आदिती खांबेकर, शितल सुरभैया, प्रांजल डांगे, प्राची निमसे, वैष्णवी निमसे, श्रुती नागरे, भक्ती चव्हाण, परी चव्हाण विद्यार्थी उपस्थित होते.


फोटोओळी:-
राहाता येथील नाद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती गीत सादर केले.
