सुरेगांव सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे प्रशांत वाबळे उपाध्यक्षपदी शंकरराव कदम…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील सुरेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रशांत प्रतापराव वाबळे तर उपाध्यक्षपदी शंकरराव कचरू कदम यांची बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ होते.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष विपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली आमदार काळेच्या बालेकिल्ल्यातील सुरेगांव सोसायटीची सत्ता पुर्ण बहुमताने काबीज करून सभासद शेतक-यांचा विश्वास संपादन केला असुन सदरची निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, शेतकरी संघाचे संचालक छबुराव माळी, पांडुरंग वाबळे, दिपक हुडे, शांताराम मेहेरखांब, उत्तमराव निकम, यशवंत निकम, सोपान सोनवणे, सर्जेराव वाबळे, भरत वाबळे, रामभाउ वाबळे यांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर उपस्थित होते. विलासराव वाबळे यांची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा व सुरेगांव सोसायटीची शंभर टक्के वसुली झाल्याबददल सर्व संचालकांचाही यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष प्रशांत वाबळे म्हणाले की, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद शेतक-यांसाठी असलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करून संस्थेच्या नांवलौकीकात भर घालु. सचिव शांताराम सुकदेव कदम व राजेंद्र भंडारे यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- कोपरगाव
सुरेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रशांत प्रतापराव वाबळे तर उपाध्यक्षपदी शंकरराव कचरू कदम यांची बिनविरोध निवड झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *