
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नवनाथ धोंडीबा गोरे व व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब लक्ष्मण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या वेळापूर सेवा सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाकडून सत्ता काबीज करून सर्वच्या सर्व १३ जागेवर काळे गटाचे सदस्य निवडून आले होते. या सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदासाठी नवनाथ धोंडीबा गोरे यांच्या नावाची सूचना राजेंद्र गुजर यांनी मांडली त्या सुचनेस अशोक भगत यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी बाळासाहेब लक्ष्मण शिंदे यांच्या नावाची सूचना सोपान जाधव यांनी मांडली त्यास दीपक पाटोळे यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एस. जोशी यांनी चेअरमनपदी नवनाथ धोंडीबा गोरे व व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब लक्ष्मण शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक कामी सचिव संजय दिघे यांनी सहकार्य केले.
यावेळी सोसायटीचे संचालक दिपक रामदास पाटोळे, राजेंद्र खंडेराव गुजर, सोपान रंगनाथ जाधव, अशोक सखाहारी भगत, जयवंत दत्तात्रय मंडलिक, अमोल सुनील वैराळ, सुनील श्रीपत वैराळ, बाळू गणपत पगारे, सौ. परीगाबाई तुकाराम खोडके, सौ.मंगल भाऊसाहेब गोरे, विजय दत्तात्रय आहेर, तसेच रतनराव कदम, दिलीप वैराळ, दगू गोरे, देवराम वैराळ, रवि गुजर, बळवंत पगार, अशोक आहेर, विठ्ठल गुजर, विश्वंभर वैराळ, दत्तात्रय मंडलिक, राहुल जगधने, सचिन जगधने, जनार्दन गोरे, अनिल वैराळ, दिलीप गोरे, दतात्रय पाटोळे, राजू आहेर, शंकर शिंदे, बापू आहेर, पुंजाराम भगत, बाळासाहेब गोसावी, बाळासाहेब आहेर, माणिक मोकळ, सुदाम भोसले आदींसह सोसायटीचे सभासद व वेळापूर ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन नवनाथ धोंडीबा गोरे व व्हा. चेअरमन बाळासाहेब लक्ष्मण शिंदे यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
