कोपरगाव येथील संवत्सर येथे आधार नोंदणी केंद्र सुरु राजेश आबा परजणे यांचे हस्त उद्घाटन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत कोपरगाव तालुक्यामध्ये संवत्सर येथे कायमस्वरूपी आधार नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले. तसेच १ ते १५ तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांच्या नवीन आधार नोंदणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आधार नोंदणी शिबीर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या गावामध्ये मा. श्री राजेश आबा परजने यांच्या हस्ते नवीन आधार नोंदणी केंद्र व आधार नोंदणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

सदर आधार नोंदणी शिबिरामध्ये ० ते ६ वयोगटातील ज्यांचे आधार कार्ड काढायचे बाकी असतील अशा मुला-मुलींचे आधार कार्ड काढण्यास प्रामुख्याने प्राधान्य असेल, तसेच येथे नवीन आधार काढणे, बायोमेट्रिक अपडेट करणे, नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्त करणे, मोबाईल नंबर व ई -मेल आयडी लिंक करणे इ. कामे केले जातील.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा श्री. राजेश आबा परजणे, संवत्सर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. सुलोचनाताई ढेपले, उपसरपंच श्री. विवेक भाऊ परजणे, ग्रापंचायात सदस्य श्री. महेश भाऊ परजणे, पंचायत समिती सीडीपीओ श्री वाघिरे साहेब, विस्तार अधिकारी श्री. बाळासाहेब साबळे , संवत्सर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री कृष्णादास अहिरे साहेब, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वृंद,आधार केंद्र चालक श्री सतिष कदम व श्री एकनाथ लामखडे, ग्राहक सेवा केंद्र चालक चारुदत्त गायकवाड, मराठा विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री राहुल भाऊ आढाव,उपाध्यक्ष श्री संतोष पेकळे , सचिव श्री संतोष कुटे, सदस्य श्री संतोष भाऊ जाधव,श्री शशिकांत दवंगे,श्री अनिल शिंदे,श्री.रवींद्र जगताप,श्री.शशिकांत गायकवाड,श्री. अनंत गोडसे श्री. कदम,श्री.जाधव श्री. राहुल गायकवाड,श्री.संदीप आहेर,श्री.सोमनाथ ढवळे व संवत्सर पंचकृषीतील ग्रामस्थ तसेच आजी – माजी पदाधिकारी व जेष्ठ मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *