कोपरगाव पिपल्स बँकेत मोबाइल बँकिंग सेवा प्रारंभ…

Uncategorized

कोपरगाव वार्ताहर- अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेने नुकतेच आपल्या
ग्राहकांच्या सेवेकरिता मोबाइल बँकिंग सुविधा सुरुवात केली आहे. सदर सेवेचा प्रारंभ लेखा परीक्षक परीक्षित भदादे, कौशल मुंदडा चार्टड अकाऊंट, चेअरमन सत्येन मुंदडा व बँकेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कोपरगाव पीपल्स बॅंकेने नुकतीच नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणानुसार आपल्या खातेदारांकरिता ही डिजिटल बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांकरिता मोबाइल बँकिंग सुविधा सुरू केली आहे. यामुळे आपल्या मोबाइल वरुन फंड ट्रान्सफर, खाते उतारा, व इतर बँकिंग सेवा मिळणार आहे. प्रारंभी संगणक विभाग प्रमुख चंद्र शेखर व्यास यांनी सदर सेवेविषयी माहिती दिली व आय.एम.पी. एस, यूपीआय सेवा लवकरच सुरू करीत असल्याचे नमूद केले यापूर्वी बँकेने ए.टी.एम सुविधा सुरू केलेली आहे. ग्राहकांना यामुळे बँकिंग सुविधेचा फायदा होणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी संगितले. खूप कमी कालावधीत आपल्या बँकेने तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे असे कैलासशेठ ठोळे यांनी सांगितले. मोबाइल बँकिंग सुरू करण्यासाठी बी.एस.जी सॉफ्ट-वेअर व संगणक विभागाच्या सर्व सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली असे कम्प्युटर कमिटी चेअरमन रविंद्र ठोळे यांनी संगितले. यावेळी आयटी टिम मधील सर्व सेवकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन आशिश रोहमारे यांनी केले सदर कार्यकम प्रसंगी संगणक समिती चेअरमन रविंद्र ठोळे, व्हा.चेअरमन प्रतिभा शिलेदार, संचालक कैलासचंद ठोळे, डॉ. विजय कोठारी, सुनील कंगले , कल्पेश शाह, अतुल काले , धरमचंद बागरेचा, हेमंत बोरावके, सुनील बंब, राजेंद्र शिंगी , वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, संदीप रोहमारे, प्रभावती पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे , संगणक विभाग प्रमुख चंद्रशेखर व्यास , गणेश काळे, सदाशिव धारणगांवकर व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी निखिल निकम यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *