
कोपरगाव प्रतिनिधी:-
57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर तसेच के जे सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज 21 जून 2022 रोजी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या आदेशान्वये कोपरगाव सेक्टर येथील एस एस जी एम महाविद्यालय तसेच राहता शिर्डी कोळपेवाडी येवला व कोपरगाव येथील विविध शाळेमधील व महाविद्यालयांमधील एनसीसी छात्र सैनिक सदरील योग दिनानिमित्त के जे सोमैया महाविद्यालयातील प्रांगणामध्ये मध्ये एन ओ सोबत हजर होते. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना यातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला.
सदरील कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील योग खेळाडू विद्यार्थी प्रज्वल ढाकणे वैष्णवी ढाकणे युवराज नलगे यांनी एनसीसी छात्र सैनिकांना व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सोबत छात्र सैनिक व विद्यार्थ्यांनीही विविध आसन केले त्यामध्ये योग खेळाडू विद्यार्थ्यांनी या आसनांचे महत्त्व सांगितले सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. व्ही. एस. साळुंके यांनी केले नियोजन शारीरिक शिक्षक संचालक प्राध्यापक डॉ. कुटे सर, डॉ. शिंदे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार एस एस जी एम महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट चौधरी यांनी केले सदरील योग दिनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अशोक आन्ना रोहमारे सचिव माननीय संजीव दादा कुलकर्णी सदस्य माननीय संदीप भाऊ रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ.बी.एस.यादव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मार्गदर्शन केले व सर्वांचे अभिनंदन केले.
