सामाजिक कार्यात कोल्हे कुटुंबियांचा सिंहाचा वाटा:- केशव भवर…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेऊन त्यांच्या अडअडचणीची सोडवणूक करण्यात संजीवनी उद्योग समूह व कोल्हे कुटूंबियांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद केशव भवर यांनी केले.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दत्त मंदिर (शिरसगांव) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान, माजीमंत्री शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, डॉ. प्राची पवार यांच्या निलवंसत मेडीकल फाऊंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक, मणिशंकर आय हॉस्पीटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
श्री. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव निकम, उत्तमराव चरमळ यांची भाषणे झाली.


याप्रसंगी सर्वश्री. नारायणराव गायकवाड, विष्णुपंत क्षीरसागर, संतोष भागवत, बाबासाहेब सुंभे, रावसाहेब जाधव, विश्वासराव महाले, वेणुनाथ बोळीज, ज्ञानदेव भागवत, अशोक गायकवाड, रंजन साळुंके केशव गायकवाड, गोरख टुपके, गंगाधर शिंदे शिवाजी भगुरे, अनिल मलिक, गोविंद मलिक, रामदास मांडुडे, भानुदास रानोडे, प्रकाश शिंदे, मनोज तुपे, अशोक शिंदे, सखाराम निकम, अंबादास पाटोळे, किसन गव्हाळे, किरण शिंदे, बबन शिंदे, पंढरीनाथ म्हस्के, गोपीनाथ शिंदे, सुभाष शिरसाठ, अशोक तिपायले, सुदाम कर्पे, डॉ. महेंद्र चौधरी, मोहिनी गायकवाड, नवनित चड्डा, डॉ. मडकर, डॉ. पठाण, बशिरभाई पटेल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *