
कोपरगाव प्रतिनिधी:-
गायत्री कॅम्पस चांदेकसारे ता . कोपरगाव येथून चोरी केलेला रोडरोलर व आरोपीला कोपरगाव तालुका पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद , कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 220/2022 भा.द.वि.क. 379 प्रमाणे दिनांक 14 // 06 / 2022 रोजी 01 : 12 वा . दाखल करणेत आलेला आहे . दिनांक 29/05/2022 रोजी सकाळी 8:00 ते 10:30 वा . दरम्यान गायत्री कंन्ट्रक्शन कॅम्पस चांदेकसारे ता . कोपरगाव येथुन रोडरोलर नंबर एपी 03 टी 3902 हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला असल्याबाबत श्री बापू जलापती रेडडी वय 42 वर्षे , धंदा खाजगीनोकरी , रा . आयतापल्ली ता . पेगडापेल्ली जि . करीमनगर राज्य तेलंगना यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करणेत आलेला आहे . कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुन्हयाचे तपासाचे चक्रे फिरवुन चोरीस गेलेल्या मुददेमालाचा व आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेवुन तपास करुन सदरचा रोडरोलर चोरुन नेणारा आरोपी नामे शिवानंद धर्माआण्णा नाईक वय 42 वर्षे , हल्ली रा . साईसिटी कोपरगाव ता . कोपरगाव . मुळ रा . मोरब ता . रायबाग जि . बेलगाव राज्य कर्नाटक यास पोलीसांनी अवघ्या 24 तासाचे आत सापळा रचुन शिताफिने जेरबंद केले असुन त्याचे कडुन चोरीस गेलेला मुददेमाल , 1200000 / – रुपये किंमतीचा रोडरोलर नंबर एपी 03 टी 3902 हा चिखलठाणा जि . औरंगाबाद येथुन हस्तगत करणेत आलेला आहे . सदरची कौतुकास्पद कामगीरी मा.पोलीस अधिक्षक , श्री मनोज पाटील सो , मा . अपर पोलीस अधिक्षक सो , स्वाती भोर मँडम , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री संजय सातव सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे श्री दौलत जाधव पोलीस निरीक्षक श्री सुरेश आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक , पोहेकॉ इरफान शेख , पोकॉ अनिश शेख , सायबर सेल श्रीरामपूर येथील पोना / फुरखान शेख यांनी केली आहे . ( दौलत जाधण ) पोलीस निरीक्षक कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर
