संजीवनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रदीपराव नवले तर उपाध्यक्षपदी राजेंद्र परजणे यांची बिनविरोध निवड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रदीपराव माधवराव नवले तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सखाहरी परजणे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदासाठी श्री प्रदिप माधवराव नवले यांच्या नावाची सुचना संचालक शिवाजीराव सिताराम लहारे यांनी केली तर त्यास संचालक राजेंद्र बागुल यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र सखाहरी परजणे यांच्या नावाची सुचना संचालक श्रीकांत नानासाहेब चांदगुडे यांनी केली तर त्यास संचालिका सौ मंदाकिनी अनंत बडवर यांनी अनुमोदन दिले.
संजीवनी सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली त्यात सर्वश्री. भाउसाहेब लक्ष्मण आदिक, संदिप वामनराव गुरूळे, रमेश सखाहरी उगले, सौ. मनिषा गणपत राउत, सतिष सुभाषराव आव्हाड यांची संचालक म्हणून निवड झाली.
श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी पतसंस्थेचे रोपटे लावले त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असुन अहमदनगर नाशिक कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेचे लवकरच महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र करण्यात येणार आहे. संस्थेकडे १३५ कोटी रूपयांच्या ठेवी असुन १०७ कोटींचे कर्जवाटप केले आहे., गुंतवणूक ५१ कोटी रुपये आहे, पतसंस्थेचा स्वनिधी २५ कोटी रूपये असुन ३१ मार्च अखेर बँकेस २ कोटी २२ लाख रूपयांचा नफा झाला आहे. थकबाकीचे प्रमाण ३.८० टक्के आहे.
सत्कारास उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदिपराव नवले म्हणाले की, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे अतिशय अभ्यासुवृत्तीने संजीवनी पतसंस्थेचे कामकाज हाताळत आहेत. शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशिल राहु, उपाध्यक्ष राजेंद्र परजणे म्हणाले की, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिलेल्या संधीच्या माध्यमांतुन संजीवनी पतसंस्थेच्या नांवलौकीकात भर घालू. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव विष्णु रोहमारे यांनी आभार मानले. याप्रसंगी शरद थोरात, साईनाथ रोहमारे, त्र्यंबकराव सरोदे, मच्छिंद्र टेके, साहेबराव रोहम आदी उपस्थित होते.

फोटोओळी:- कोपरगांव
संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रदीपराव माधवराव नवले तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सखाहरी परजणे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *