15 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी
(अहमदनगर):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व शासकीय उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने दिनांक १५ जुन. २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये एकुण ५५७ रिक्तपदे असून जिल्ह्यातील इटॉन इंडस्ट्रिअल सिस्टम प्रा. लि., श्री व्यंकटेश मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी, कमिन्स जनरेटर इंडिया प्रा.लि., बोथरा अँग्रो इक्वीपमेंट, आम इंडिया मॅन्युफॅक्चरींग कॉर्पोरेशन प्रा. लि., आकाश प्रिसीजन कंपोनंट्स प्रा. लि., सन फार्मास्युटीकल इंडस्ट्रिज लि., एक्साईड इंडस्ट्रिज लि., सन इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस, इंडोस्कल्प अॅटोकॉम प्रा. लि., सिद्धी प्रिसिजन कंपोनंट अॅण्ड अॅसेसरीज प्रा. लि., जि. के. एन. सिंटर मेटल्स प्रा. लि., बजाज पॉवर इक्वीपमेंट प्रा.लि., सिध्दी सीएनसी प्रा.लि., फिनिक्स एन्टरप्रायझेस, अहमदनगर इत्यादी नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नांव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकाकडे अर्ज करावा. किंवा https://forms.gle/uEnEXNv64J4SB5K7A या लिंक वर अथवा सोबत दिलेला QR Code स्कॅन करुन मेळाव्यासाठी नांव नोंदणी करावी. सर्व इच्छुक उमेदवारांनी दिनांक १५ जुन, २०२२ रोजी सकाळी १०-०० वा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक श्री. तौफिक सौदागर, मो.नं. ९८८१६६५१११ व श्री स्वप्निल ठाणगे मो.नं. ९८२२१८१११४ यांच्याशी संपर्क साधावा. इच्च्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करुन रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *