बालगोपानांनी लुटला मनमुराद आनंद…
कोपरगांव प्रतिनीधी:-
परीक्षेचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरू होते. याच सुट्टीचा फायदा घेत बालकांमध्ये विविध खेळांची आवड निर्माण व्हावी तसेच इतरही व्यक्तिमत्वाची मुल्ये विकसीत व्हावी, या हेतुने शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी मध्ये पाच दिवसांचे पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात शिर्डी व पंचक्रोशितील बालकांनी मनमुराद आनंद लुटला व विविध खेळांचेे प्रशिक्षण घेवुन अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. अशा प्रकारचे शिबीर हे शिर्डी मध्ये घेण्यात आल्याने पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
मागील सुमारे दोन-आडीच वर्षांपासून कोविड-१९ च्या महामारीमुळे बालकांचे मैदानावर जाणे, तेथे मनमुराद खेळणे व त्यातुन खेळाचा आनंद लुटणे, हे सर्व थांबले होते. यामुळे त्यांच्यात उन्हाळी शिबिरामुळे दररोजचा उत्साह अगदी ठासुन भरला होता. पालकांनीही त्यांच्या पाल्यांना मोठ्या आनंदाने शिबिरात सहभागी केले. या शिबिराचा समारोप सौ. कलावतीताई नितीनदादा कोल्हे यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ आॅफ इन्स्टिट्याुटस्चे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, डाॅ. मनाली कोल्हे, हेड प्रिन्सिीपाल सौ. सुदरी सुबगमण्यम, प्राचार्या मोना भाराक्टिया, आदी उपस्थित होते. संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्याुटस्चे कार्याध्यक्ष यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
पाच दिवस चाललेल्या या शिबिरात त तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्फत रायफल शुटींग, ट्रेझर हंट, बीबीक्यु नाईट, कॅम्पफायर, आऊट डोअर कुकरी, ट्रेकिंग, स्टर केझिंग, योगा, सॅलड कटींग, स्टोन आर्ट, टॅलेंट नाईट, ट्रीप टू वन मोनुमेंट, हाॅर्स रायडिंग, करावके, नेचर वाॅक, वाटर फ्रंट फन, जर्मन लॅग्वेज, मेमरी गेम्स, स्वीमींग, हीपहाॅप, अॅक्टींग स्कूल, पाॅटरी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. सर्व बालकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शेवटच्या दिवशी सहभागी बालकांनी झुंबा नृत्याचे सादरीकरण केले तसेच करावके संगीतावर सुंदर गीतेही गायली.
शिर्डी मध्ये सुरू केलेल्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूल हे ४० वर्षांची प्रदिर्घ यशस्वी परंपरा असलेल्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची शाखा आहे. या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधित नावलौकिक प्राप्त केल्याने आपल्या पाल्याला शैक्षणिक गुणवत्तेचे शिक्षण तर मिळणारच, परंतु त्यांच्यात बहुआयामी व्यक्तिमत्वांचीही रूजवण होणार, सुशिक्षित होण्याबरोबरच ते सुसंस्कृतही होणार, याची खात्री पालकांना येत असल्यामुळे पालकांचा त्यांच्या पाल्यांना संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढत आहे.

फोटो ओळी:- सौ. कलावतीताई कोल्हेे व डाॅ. मनाली कोल्हे यांचे समवेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी योजीत उन्हाळी शिबिरात सहभागी झालेले विध्यार्थी व शिक्षक वृंद.
