
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अरेरावीची व दमदाटीची भाषा तसेच असभ्य वर्तना विरोधात कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रामध्ये 23 जून 2018 पासून प्लास्टिक बंदी करण्यात आली पण सरसकट प्लास्टिक बंदी असली तरी शासनाने विविध सूचनांचा विचार करून प्लास्टिक मध्ये वापरात येणाऱ्या
प्लास्टिक पिशवीच्या जाडीची मर्यादा 50 मायक्रोनपेक्षा अधिक असणं बंधनकारक करण्यात आली होती.
सरकारने प्लास्टिक बंदी केली खरी मात्र प्लास्टिकला ठोस असा पर्याय अजूनही उपलब्ध करून दिलेला नाही हे वस्तुस्थिती आहे. प्रामुख्याने या प्लास्टिक बंदी मुळे दुकानदार,व्यापारी व ग्राहक यांचे नुकसान झाले पण पर्यावरण संरक्षण करण्यासाठी त्यांनी या बंदीचे स्वागत केले.
महाराष्ट्रातील इतर तालुक्याप्रमाणे
कोपरगाव तालुक्यात आणि
शहरात प्लास्टिक बंदी करण्यात आली वेळोवेळी कोपरगाव नगर पालिकेने प्लास्टिक वापरावर जप्तीच्या कारवाया केल्या. कोपरगाव मधील दुकानदार,व्यापारी,ग्राहकांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले.
आजघडीला कोपरगाव नगरपालिका कर्मचारी प्लास्टिक बंदी कारवाया करताना दिसतात मात्र या बंदीच्या नावाखाली एकाचवेळी १० ते १२ कर्मचारी दुकानात घुसून दुकानदारांना अरेरावीची व दमदाटीची भाषा करून असभ्य वर्तन करत असल्याचा प्रकार कोपरगावात घडत आहे.या गोष्टीचा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
काका कोयटे म्हणाले की,
ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानात ५० मायक्रोनच्या पुढच्या पिशव्या वापरत आहेत त्या सुद्धा जप्त केल्या जात आहे ही खूप अचंबित करणारी गोष्ट आहे.
व्यापाऱ्यांच्या दुकानात एकाच वेळी 10 ते12 नगरपालिका कर्मचारी जाऊन दंडाच्या पावत्या फेकत, अरेरावीची भाषा करन दमदाटी करण्याचा प्रकार बेकायदेशीर असून
त्यामुळे व्यापारी व दुकानदार यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापाऱ्यांनी नम्रतापूर्वक व सभ्यपणे त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला परंतु हे कर्मचारी ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केली याचे सर्व व्यापारी समर्थन करतता तसेच व्यापारी ५० मायक्रोनच्या पुढिल पिशव्या वापरात असतानासुद्धा त्यांचेवर अरेरावीची व दमदाटी करून दंडात्मक कारवाई केली जाते ही निदनीय गोष्ट आहे.तसेच अशा प्रकारची अरेरावी व दमदाटी सहन केली जाणार नाही असे ही ते म्हणाले
व्यापारी ५० मायक्रोनच्या पुढील पिशव्या वापरतील परंतु भाजीपाला, फळे विक्रेते, चहा विक्रेते अशा किरकोळ विक्रेत्यांना ५० मायक्रोनच्या पिशव्या वापरणे परवडत नाही या बाबतीत शासनाने देखील पर्याय उपलब्ध करून द्याला हवा. तसेच कोपरगाव नगरपालिकेने देखील हा पर्याय उपलब्ध करण्यास पुढाकार घेतल्यास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यात सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.
कोपरगाव शहरात व्यापारी महासंघाने सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविणे, कोपरगाव शहरातला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तलावातील गाळ काढणे, कोरोनाचे काळात अन्नदान योजना राबविणे यांसारख्या अनेक सामाजिक योजनांत नेहमीच पुढाकार घेतला आहे. कोपरगाव शहरात खराब रस्ते, प्रचंड धुळीचा त्रास सहन करत व्यापारी वर्ग आपले दुकान चालवत आहे. कोरोना काळात प्रचंड मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आता कुठे पुन्हा स्थिर स्थावर होत असताना होत असेलेली धडक कारवाई हि व्यापाऱ्यांना जाचक होत आहे. तसेच व्यापारी वर्गानेही ५० मायक्रो पेक्षा खाली कॅरी बॅगा वापरू नये असे आवाहन व्यापारी महासंघ व अध्यक्ष काका कोयटे यांच्या
वतीने करण्यात आले आहे.
