“हनुमान नगर येथील बालवाडीची दुरुस्ती करावी”:-अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहरातील हनुमान नगर (१०५) मधील बालवाडी ची दुरवस्था झाली असून जून मध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी बालवाडी इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे


आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की शासनाने सर्व सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून धोरण आखले असून त्याचाच एक भाग म्हणून ठिक ठिकाणी सरकारी शाळा सुरू केल्या त्याच प्रमाणे छोट्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून बालवाडी सुरू केल्या मात्र कोपरगाव शहरातील हनुमान नगर (१०५) येथे अत्यंत गरीब,मजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करणारे लोक राहतात या ठिकाणी नगर पालिकेने बालवाडी सुरू केली मात्र या बालवाडीची सद्या अत्यंत दुरवस्था झाली असून शाळेच्या इमारतीचे पत्रे सडून गेले आहेत तर यापूर्वी तुटलेले पत्रे काढून या शाळेच्या पढवी मध्ये अस्ताव्यस्त ठेवलेले आहेत शाळा वाल कंपाऊन नसल्याने ही शाळा मोकाट जनावरांचा अड्डा बनली आहे या परिसरातील अनेक गोरगरीब मुले या बालवाडीत शिक्षणाचे धडे गिरवतात मात्र शहरात अनेक विकास कामाची चढाओढ असली तरी या परिसरातील बालवाडी कडे नगर पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे एका बाजूला उच्चभ्रू कुटुंबातील मुलांना दर्जेदार शाळेत प्रवेश मिळण्यासाठी लाखो रुपये मोजले जातात मात्र गोरगरीब कुटुंबातील मुलांना सरकारी शाळे शिवाय पर्याय नाही असे असले तरी या शाळेत शिकत असताना मुलांना त्रास होऊ शकतो त्याच प्रमाणे या ठिकाणी पडलेल्या पत्र्यामुळे लहान मुलांना एखाद्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले या शाळेच्या दुरावस्थे बाबत नुकतीच कोपरगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन या बालवाडीच्या दुरुस्ती ची मागणी
त्यामुळे नगर पालिकेने पावसाळ्यापूर्वी या बालवाडीची दुरुस्ती करावी अशी मागणी अँड.नितीन पोळ व बाळासाहेब पवार यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *