

कोपरगाव प्रतिनिधी:-
आनंदाची बातमी साईआश्रयतील दोन कन्यांचा जमला विवाह यंदा कर्तव्य आहे शिर्डी साईआश्रयतील गणेश दळवी यांची सातवी कन्या शितल शिक्षण - BA हिचा विवाह धुळे तालुक्यातील खांडलाय येथील शेतकरी कुटुंबातील मा. भीमराव नथू पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव उमेश शिक्षण - HSC यांच्याशी योजिले आहे या पाटील कुटुंबाकडे 15 एक्कर बागायती शेती व 2 हजार सक्वेअर फुट जागेत दोन मजली घर व 4 चाकी वाहन आणी होलसेल किराणा दुकान आहे

मुलगा सर्व गुण संपन्न आहे तसेच दुसरा विवाह शिर्डी साईआश्रयतील गणेश दळवी यांची 8 वी कन्या भाग्यश्री हिचा विवाह मा. अर्जुन वाघमारे यांचे जेष्ठ चिरंजीव आकाश यांच्याशि योजिले आहे तेव्हा आज मा. नगरसेवक अशोकभाउ गोंदकर पा. , दत्तूभाऊ सोमवंशी , ह भ प बाळकृष्ण महाराज सुरासे , सर्वज्ञ् सर , आमून मामून सर , राजूभाऊ चिंधे , खांडलाय येथीलसाईराम श सोनावणे दिनेश दळवी आदी मान्यावर उपस्थित होते तेव्हा साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने येत्या दी. 24/5/2022 झाली सायंकाळी 6 वा. साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम व दी. 25/5/2022 रोजी दुपारी 12:51 या शुभ मुहूर्तावर विवाह संपन्न होणार

आहे लवकरच साईआश्रया परिवार तुम्हा सर्वांना आमंत्रित करणार आहे आपण या अनाथ मुलींना शुभ आशीर्वाद द्यावे ओम साई राम साई सेवक - गणेश दळवी मो - 9637549300

