

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील विनोद राक्षे यांचे बाँलीवृड अभिनेता सोनु सुद यांच्याशी मैत्रीचे नाते आहे.सोनु सुद सध्या सामाजिक कार्यात अग्रेसर झाले आहे.त्यांनी अनेक गोर गरिबांना मदत केली आहे.

दि ४ मे २०२२ रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे भारत रत्न डाँ.अब्दुल कलाम नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील २६ आशा सेविकांना सोनु सुद यांनी सायकली वाटप केले आहे.यापूर्वी देखील त्यांनी कोपरगावात गोर गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप केले होते.अभिनेता सोनु सुद दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणुन पुढे येत आहे.

त्यामुळे त्यांना गरिबोका मसिहा म्हणुन त्यांची ओळख निर्माण होत आहे.या कार्यक्रमाप्रसंगी अभिनेता सोनु सुद माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले, विनोद राक्षे,डाँ.गायत्री कांडेकर, डाँ.सचिन मुंडे,कैलास जाधव,संदीप देवकर राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी यांच्यासह कोपरगावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी अभिनेता सोनु सुदचा सत्कार केला आहे.

