कोपरगावात लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव २७ एप्रिल पासून…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे कोरोनाच्या संकट काळानंतर लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव २७ एप्रिल पासून सुरू होत आहे.कोपरगाव तालुक्यातील आनंदाची पर्वणी असलेला हा महोत्सव होय.मनोरंजन, व्यापार, व्यवसाय,सांस्कृतिक कार्यक्रम असलेला हा एक्सपो म्हणजे कोपरगावकरासाठी आनंदाचा क्षण आहे.या कार्यक्रमातुन कला गुणांना वाव मिळतो.तरुणांना मार्गदर्शन आणि बाजारपेठेला चालना मिळत असते. असा लायन्स लिनेस व लिवो क्लब आयोजित लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २७ एप्रिल २०२२ पासुन करण्यात आलेले आहे. अशी माहिती श्री. सत्येन मुंदडा यांनी दिली.हा महोत्सव ५ दिवसांचा असून या महोत्सवाचे प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व प्रायोजक संजीवनी ग्रुप,गोदावरी दुध संघ, समता पतसंस्था व कुटे ग्रुप आहे अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. राम थोरे यांनी दिली.या महोत्सवाचे उद् घाटन नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. व प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना.श्री आशुतोष काळे ,माजी आ.सौ स्नेहलता कोल्हे, श्री राजेश परजणे ,श्री ओमप्रकाश कोयटे , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सुजय विखे ,खासदार सदाशिव लोखंडे ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील व इतर मान्यवर असणार आहेत या महोत्सवात मुख्य आकर्षण म्हणून मराठी मालिका रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमळेकर व माधवजी अभ्यंकर हे असणार आहेत अशी माहिती श्री संदीप कोयटे यांनी दिली.या महोत्सवास टॉक शो ,डान्स, गायन स्पर्धा, 1 मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची कला संस्कृती दर्शन असे विविध सांस्कृतिक उपक्रम ठेवले आहे. अशी माहिती श्री राजेश ठोळे यांनी दिली.महिलांसाठी उत्सव आनंदाचा खेळूनी साऱ्या जनी. हा मनोरंजन खेळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे असे लिनेस क्लब अध्यक्षा सौ. भावना गवांदे यांनी सांगितले.या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी माझा महाराष्ट्र या विषयावर चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली अशी माहिती श्री प्रसाद भास्कर यांनी दिली.या एक्स्पोमध्ये कंजूमर, फुड, ऑटो असे मिळून 150 स्टॉल असणार आहेत. कोपरगाव च्या व्यावसायिकांसाठी सवलतीच्या दरात व बचत गटांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिल्याची माहिती श्री सुमित भट्टड यांनी दिली.नागरिकांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून स्टॉल्स परिसरामध्ये फोगर्स व कुलर चे नियोजन केले आहे असे राहुल नाईक यांनी सांगितले.

निमंत्रण पत्रिकेचे अनावरण सौ. वर्षा झंवर, श्री. सचिन भट्टड, श्री. धरमभाऊ बागरेचा, श्री .पराग संधान, श्री. पदमाकांत कुदळे, श्री.औताडे साहेब,डाँ.अस्मिता लाडे,अँड विजय गवांदे,ठोळे भामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.महोत्सवाची सांगता 1 मे या महाराष्ट्र दिनी होत असल्यामुळे या संपूर्ण महोत्सवाची व सजावटी महाराष्ट्र या थीमवर आधारित केलेले आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद भास्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश शिंदे यांनी मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *