अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या मुख्य विश्वस्त पदी:- श्री. पद्माकांत कुदळे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाची सभा गुरुवार दि. २८/०१/२०२१ रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय सेंट्रल पार्क पुणे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त श्री. विश्वनाथ भालिंगे (मुंबई) यांनी मुख्य विश्वस्त पदाचा राजीनामा दिल्यामुळे विश्वस्त मंडळाने एकमताने श्री. पद्माकांत कुदळे यांची मुख्य विश्वस्त पदी निवड केली. या संस्थेचे सुमारे १४ हजारांपेक्षा जास्त सभासद असुन ४ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती चा लाभ घेतला आहे.
श्री. पद्माकांत कुदळे हे गेली १२ वर्षांपासून विश्वस्त म्हणून संस्थेवर कार्यरत आहे.त्यांनी कोपरगाव साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, कोपरगाव चे नगराध्यक्ष, समता परिषद तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व रयत संस्थेच्या अनेक शाळा व कॉलेजवर पदाधिकारी म्हणून अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेले असुन संस्था उच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देईन असे आश्वासन दिले. यावेळी तज्ञ विश्वस्त प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ यांनी मावळते मुख्य विश्वस्त श्री. विश्वनाथ भालिंगे यांचा सत्कार केला तसेच प्रा.एम.एस.फुले यांनी नुतन मुख्य विश्वस्त श्री. पद्माकांत कुदळे‌ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष‌ श्री. दिलीप राऊत , सरचीटनीस श्री. प्रशांत एकतपुरे , विश्वस्त सौ. निलीमा सोनावणे (नाशिक) , श्री. प्रकाश लोंढे , श्री. रवि चौधरी (पुणे) , प्रा. संपतराव शिंदे (फलटण) , श्री. एम.बी.महाजन (जळगाव) ,
इ. विश्वस्त उपस्थित होते.
सरचिटणीस श्री. प्रशांत एकतपुरे यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *