वारीत आर्मीचे जवान नायक राजेंद्र टेके यांचे हस्ते ध्वजारोहण…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनी वारीचे भूमिपुत्र देशसेवेत असणारे इंडियन आर्मीचे जवान नायक राजेन्द्र काशिनाथ टेके यांचे हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालया समोर उपसरपंच सौ. मनीषाताई गोर्डे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जि प प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यपक कराळे सर तर रामेश्वर विद्यालय वारी येथे मुख्याध्यपक सुनिल निकाळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली
दोन वर्षांपासून देशाच्या सेवेत असणाऱ्या जवानांच्या हस्ते वारीत ध्वजारोहण होत असल्याने सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत सरपंच सतिश कानडे व पंचायत समिती सदस्य मधुकर टेके यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
रामेश्वर विद्यालय वारीच्या विध्यार्थ्यांनी संचलन केले यावेळीं शिक्षक कैलास शेळके यांनी सामुदायिक संविधान वाचन घेऊन ग्रामस्थांनी यावेळी शपथ घेतली.


झेंडावंदन कार्यक्रमाला सरपंच सतिश कानडे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, माजी सभापती मच्छिंद्र टेके, माजी प स सदस्य अशोक कानडे, विशाल गोर्डे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, रावसाहेब टेके, बाबासाहेब शिंदे,सचिन टेके,प्रशांत संत,ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरे, अनिता संत,सुवर्णा गजभिव ,अश्विनी खैरनार ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे , तलाठी वडीतके ,मुख्याध्यपक निकाळजे यांचे सह सर्व शिक्षक ,पोलिस, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *