शिंगणापूर सोसायटीचा विजय सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेंना समर्पित…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील शिंगणापुर येथील श्रीमान काशिनाथदादा लोणारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत काशिनाथदादा लोणारी यांच्या प्रेरणेने कोल्हे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकांत विरोधी उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यांसाठी मोठी धडपड करावी लागली. या निवडणुकीत १३ च्या १३ सर्व जागा शेतकरी विकास पॅनलने जिंकत आपले निर्वावाद वर्चस्व कायम राखले आहे.
निवडणुकीनंतर झालेल्या विजयी सभेत बोलतांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे तज्ञ संचालक मच्छिंद्र लोणारी यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन व सर्व मतदारांचे आभार मानत आजचा विजय कै काशिनाथ दादा लोणारी व कै. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा विजय असल्याने हा विजय त्यांना समर्पत करत असल्याचे जाहिर केले.
या निवडणुकीत यादवराव संवत्सरकर, एकनाथ संवत्सरकर, अंकुश कु-हे, भाउसाहेब वाघ, अविनाश संवत्सरकर, रामभाउ पहिलवान संवत्सरकर, रंगनाथ संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, काशिनाथ आढाव, प्रशांत आढाव, व प्रकाश बाबा संवत्सरकर आदि अनेक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विरोधी उमेदवारांचा दारुण पराभव करण्यासाठी प्रयत्न केला.
या निवडणुकीत भाउलाल कु-हे, भाउसाहेब आढाव, यशवंत संवत्सरकर, हिरालाल संवत्सरकर, शिवनाथ लोणारी, श्रीकांत सवत्सरकर, शंकर संवत्सरकर, जालिंदर संवत्सरकर, कुसुगबाई संवत्सरकर, शोभा कु-हे, आशिष संवत्सरकर, बुधा हिरे, देवराम पवार बहू मतांनी विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *