तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात महाविकास आघाडीची सुड भावनेतून कारवाई, कोपरगांवी निषेध:- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तालावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलीस नोटीस जारी करून दडपशाही करण्याचा जो प्रकार केला आहे तो निंदनीय व निषेधार्ह असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली होत आहे.
कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी पक्ष कार्यालयासमोर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महा विकास आघाडी शासनाने पोलीस चौकशीची नोटीस काढली त्याची होळी केली.
प्रारंभी शहराध्यक्ष दत्ता काले म्हणाले की, राज्यात अनेक भ्रष्टाचारी मंत्री महाविकास आघाडी शासनात सामील आहेत, त्यातील काही तुरुंगाची हवा खात आहे तर काही आत जाण्यांच्या तयारीत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला असुन त्यांनी उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, आणि माणिपुर चार विधानसभा निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करणाऱ्यांच्या मनसुब्यावर बुलडोझर फिरविला पण अजुनही शेखचिल्लीचे मनोरे उभे करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकचे सत्ता स्वप्न पहात आहेत., त्यांना भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आगामी प्रत्येक निवडणुकीत नक्कीच धूळ चारणार आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेकांना धडकी भरली आहे तर महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची व खोट्या केसेसची विधिमंडळात पोलखोल केल्याने अनेकांचा जळफळाट झाला आहे. खरेपणाने वागणाऱ्या फडणवीसांना पोलीस नोटीस बजावुन त्यांच्यावर एक प्रकारचे दडपण आणण्यांचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहे, त्याचा आम्ही धिक्कार करून तीव्र शब्दात निषेध नोंदवितो असे ते म्हणiले.
या प्रसंगी सर्वश्री विजय आढाव, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, विनोद राक्षे, राजेंद्र बागूल, खालीकभाई कुरेशी, रवींद्र रोहमारे, महावीर दगडे, दिपक राऊत, जयेश बडवे, .सतीश रानोडे, किरण सुपेकर, दादाभाऊ नाईकवाडे, निलेश बोऱ्हाडे, शंकर बिऱ्हाडे, .चंद्रकांत वाघमारे, विजय चव्हाणके, राजेंद्र गायकवाड, प्रसाद पऱ्हे, .फकिरमहमंद पहिलवान, अनिल जाधव, रवी शेलार, .संतोष नेरे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.

फोटो ओळी:-
कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी पक्ष कार्यालयासमोर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महा विकास आघाडी शासनाने पोलीस चौकशीची नोटीस काढली त्याची होळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *