
कोपरगाव प्रतिनिधी:-
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्फूर्ती दिन अभिवादन सोहळा प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने धर्मवीर गड श्रीगोंदा येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार वितरण करण्यात आले.या वेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांना राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव यांचे थेट वंशज श्री.शिवाजीराजे दत्तात्रयराजे जाधव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत निष्ठावंत शिलेदार म्हणून कार्य केलेल्या वीर तानाजी मालुसरे,वीर संताजी घोरपडे,वीर येसाजी कंक या वीर योध्यांचे वंशज आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूगर्जना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..!
संजीवनी यूवा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड कालावधीत कोविड सेंटरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मोफत आरोग्य सुविधा,वृक्षारोपण,रक्तदान शिबीरे,सर्वधर्मीय विवाह सोहळे,पूरग्रस्तांना मदत,स्वदेशी पॅरासिटामॉल या औषध निर्मिती क्षेत्रात विवेकभैय्या कोल्हे यांचे योगदान असे विविध व्यापक कामांची दखल घेत छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला..!
या प्रसंगी पुरस्काराचा स्वीकार करतांना युवानेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की आजचा दिवस हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा दिवस स्फूर्ती दिवस म्हणून साजरा होतो आहे यामुळे आजच्या युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी केलेल्या लढ्याचा ऊर्जादायी इतिहास अनुभवास मिळतो आहे.छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती या शब्दातच सेवा हा शब्द आहे यावरूनच हा पुरस्कार किती मौल्यवान आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.धर्मवीर गडाचा विकास व्हावा यासाठी सर्वप्रथम विजेची व्यवस्था गडावर होण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी सौरदिव्यांसाठी ५१ हजारांची आर्थिक रक्कम सेवा समितीच्या कामासाठी सेवा म्हणून देऊ केली.आपल्या राजांचा अंगावर शहारे आणणारा इतिहास हजारो तरुणांसमोर गेला पाहिजे यासाठी या ऐतिहासिक क्षण जपले जाणे आवश्यक आहे..!
मला मिळालेला हा पुरस्कार मी राजमाता जिजाऊ माँ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पन करतो व ज्यांनी कोविड काळात मोलाचे काम केले,अनेकांना मदत करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे माझे सहकारी,कोपरगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना हा पुरस्कार समर्पित करतो असे युवानेते विवेकभैय्या कोल्हे या प्रसंगी म्हणाले..!
शंभूगर्जना पुरस्कार प्राप्त झाला त्या बद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.घनश्यामआण्णा शेलार यांनी अभिनंदन केले.या वेळी कोपरगाव येथील पूरपरिस्थितीत हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी माजी मंत्री आदरणीय श्री.शंकररावजी कोल्हे साहेब व श्री.बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नांची व कामाची आठवण काढत विवेकभैय्या कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले..!
या प्रसंगी सुभेदार श्री.कुणालजी मालुसरे,श्री.आकाशराजे कंक,श्री.रणधीरआप्पा घोरपडे,श्री.अमितजी गाडे,श्रीगोंदा तहसीलदार श्री.मिलिंदजी कुलथे,जळगाव तहसीलदार श्री.महेंद्रजी माळी,डॉ.प्रणोतीताई राहूलदादा जगताप,श्री.आदेशजी नागवडे,प्रा.श्री.सतीशजी शिंदे,श्रीमती लताबाई पवार,अर्जुनजी कांचन,कल्याणीताई लोखंडे,श्री.शंकरआप्पा जाधव,भारतीताई इंगवले,श्री.चंद्रकांतजी औताडे,श्री.आप्पासाहेबजी औताडे,श्री.विलासजी रोहमारे,श्री.राजेंद्रजी मोरे,सौ.मिनाताई शिंदे,श्री.अविनाशजी पाठक,श्री.विक्रमजी पाचोरे,श्री.अनुरागजी येवले,श्री.अतुलजी सुराळकर,श्री.किरणजी गायकवाड,श्री.धनंजयजी माळी,श्री.भाऊसाहेबजी सोनवणे,श्री.विकासजी मोरे,श्री.कानिफनाथजी गुंजाळ,श्री.विशालजी गोर्डे,श्री.सिद्धार्थजी साठे,श्री.ऋषिकेषजी कदम,श्री.अमोलजी गवळी,श्री.प्रमोदजी संवत्सरकर,श्री.निखिलजी औताडे,श्री.महेंद्रजी नाईकवाडे,श्री.रोहितजी कनगरे,श्री.गणेशजी थोरात,श्री.गणेशजी मोरे,श्री.प्रशांतजी संत,श्री.सतीशजी निकम,श्री.चेतनजी कोकाटे,श्री.ज्ञानेश्वरजी सोनवणे,श्री.सागरजी तांबे,श्री.जगन्नाथजी वर्पे,श्री.गौरवजी वर्पे,श्री.अभिषेकजी शिंदे आदिंसह सहकारी,पदाधिकारी,छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी,विविध संघटना व शिव-शंभुभक्त,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!
