स्व. हिरालालजी लाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायण अग्रवाल…

Uncategorized

सोमवार दिनांक १३ मार्च २०२३ रोजी स्व. हिरालालजी लाडे यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याची बातमी समजली. स्वर्गीय भाऊंनी 30-40 वर्षांपूर्वी आपल्या भेळभत्याचा व्यवसायाची सुरुवात केली. प्रथम आठवडे बाजारात गणेश भेळ प्रसिद्ध झाली. सुरुवातीच्या काळात एसटी स्टँड समोर भेळेचा स्टॉल होता. व्यावसायिक कसोटी, प्रामाणिकपणा, उत्कृष्ट क्वालिटी च्या जोरावर केवळ कोपरगाव शहरातच नाही तर नगर जिल्हा व नंतर संपूर्ण महाराष्ट्रात गणेश भेळ प्रसिद्ध झाली. त्यांच्या दुकानवर नेहमीच गिऱ्हाईकांची गर्दी बहरली. यानंतर स्वर्गीय हिरलाल भाऊंनी मागे वळून पाहिलेच नाही.
व्यावसायिक प्रचंड यशानंतर ते सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले. आजही गणेश भेळ संपूर्ण महाराष्ट्रात कोपरगावची ओळख म्हणून प्रसिद्ध आहे. पाहुणे, सासरी गेलेल्या मुली सुद्धा कोपरगावातून येताना ‘गणेश भेळ’ आणण्याची विनंती करतात. व्यावसायिक व्याप असताना देखील त्यांनी आपल्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण दिले. आज त्यांचे चिरंजीव योगेश हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत.
स्व. हिरालाल भाऊ पुढील पिढीस नक्कीच एक ‘दीपस्तंभ’ म्हणून राहतील. अशा या दूरदर्शी व यशस्वी उद्योजकास अश्रू पूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल-
नारायणशेठ अग्रवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *