
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी तपोवन येथील शिशु विहार संस्थेतील कृष्ट कोशिका महिलांना साड्यांचे वाटप केले. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.
कृष्ट कोशिका हा रोग महारोग म्हणून ओळखला जातो. कुष्ठरोग हा संसर्गजन्य असून रुग्णाने एमडीटीची पहिली मात्रा घेतल्यावर त्यात काहीही संसर्गजन्य राहत नाही. तरी त्यांच्या कुटुंबासह समाज या बाधितांना घाबरून लांब सरकत असतो. या रुग्णांना आपल्या सर्वसामान्यांसारखे जीवन जगता येत नाही. त्यामुळे कृष्ट कोशिका बाधित विशेष रुग्णालय,आश्रम अथवा संस्थेत आपले जीवन व्यतीत करत असतात. सरकारच्या विविध योजना अमंलात आणल्या जातात परंतु त्याचा विशेष परिणाम या बाधितांवर होताना दिसत नाही, त्यांचे कुटुंब त्यांना स्वीकारत नाही. कुष्ठरोग पीडितांच्या कल्याणासाठी आणि कुष्ठरोग विषयक जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याने व याबाबत समाजात जनजागृती होणे आवश्यक असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी तपोवन येथील शिशु विहार संस्थेतील कृष्ट कोशिका महिलांना साड्यांचे वाटप केले.


यावेळी किरण पानकर, संतोष जगताप, संदीप गांगुर्डे, संदिप खैरे, जयंत गोडसे, प्रकाश आव्हाड व संस्थेचे सभासद उपस्थित होते.
