वारीत विविध क्षेत्रातील महिलांचा केला सन्मान,; महिलांनी कौटुंबिक जबाबदारी बरोबर स्वतःचे आरोग्य सांभाळावे:- विमलताई पुंडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
एकविसाव्या शतकात मनुष्यजीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे. प्रत्येक व्यक्ती फक्त कामाच्याच मागे धावत आहे. सुख साधनाच्या मागे धावतो. त्यामुळे आशा, आकांक्षा कमीच होत नाही. मात्र, अशाही परिस्थिती साधनांना महत्व द्यायचे कि, आरोग्याला हे देखील ठरविणे महत्वाचे आहे. त्यामुळे खासकरून महिलांनी कुटुंबाचा कारभार चालवताना आपल्या शरीराकडे लक्ष देत योग, प्राणायाम करून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे, असा मौलिक सल्ला कोपरगाव येथील योग प्रसार, प्रचार संस्थेच्या अध्यक्षा तथा योगशिक्षिका विमलताई पुंडे यांनी दिला आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत मोहोत्सवी वर्ष, जागतिक महिला दिन व राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारीसह परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलाचा सन्मान तसेच योग, प्राणायाम व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर मंगळवारी ( दि. ८ ) सकाळी १० वाजता वारी ग्रामपंचायत कार्यलयासमोर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १५० महिलांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवपूर्वक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीच्या माजी सदस्य कुसुमताई टेके होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर व राहुल दादा टेके पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीपप्रज्वलन करून तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी एकात्मिक बाल विकास केंद्राच्या समुपदेशक वैशालीताई झाल्टे, उपसरपंच मनीषाताई गोर्डे, महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदनाताई गोडगे, सदस्य शारदाताई पालवे, पर्यवेक्षक रेणुकाताई गायकवाड, सोमैया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीताताई पारे, साकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमाताई गोर्डे, परिचारिका विशाखाताई निळे, ग्रामपंचायत सदस्या नंदाताई निळे, सुवर्णाताई गजभिव, अश्विनीताई खैरनार, अनिताताई संत, वनिताताई चव्हाण, सरपंच सतीशराव कानडे, योग शिक्षक दत्तात्रय पुंडे, ग्रामविकास अधिकारी दिलीपराव वारकर, संरक्षक अधिकारी विकास बागुल, सहायक संरक्षक अधिकारी सचिन सगळगिळे, नरेंद्र ललवाणी, चंद्रकांत पाटील, चंद्रभान मलिक, विजय महाडिक यांच्यासह वैद्यकीय, शैक्षणिक, अंगणवाडी, आशासेविका, मदतनीस, धार्मिक, होमगार्ड, स्वच्छता विभाग याप्रमाणे शासकीय, खासगी क्षेत्रातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
यावेळी समुपदेशक वैशालीताई झाल्टे यांनी उपस्थित महिलांना महिलांच्या स्वरक्षणासंदर्भातील कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली. योग शिक्षक दत्तात्रय पुंडे यांनी योगासंदर्भात माहिती दिली. यावेळी वंदनाताई गोडगे, शारदाताई पालवे, रेणुकाताई गायकवाड, डॉ. सुनीताताई पारे, विशाखाताई निळे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णाताई गजभिव, प्रतिभाताई टेके, सायली टेके, साक्षी टेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता महाडिक व राधा टेके यांनी केले. तर ग्रामपंचायत सदस्या सुवर्णाताई गजभिव यांनी आभार मानले.
महिला दिन यश्वितेसाठी विशेषकरून वारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, सर्व कर्मचारी, मित्र परिवार, कुटुंबीय, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. तर कोपरगाव येथील सोमैया महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके, आशिर्वाद प्रिंटरचे संचालक मोहनराव उकिरडे, चंद्रप्रभा कॉस्मेटिक व लेडीज शाँपिचे संचालक संदीप आहेर, समीर आहेर, साईआर्टसचे सतीश गुजराथी, वारी येथील खैरनार कलेक्शनच्या संचालिका अश्वीनीताई खैरनार, सोळसे मंडप डेकोरेटरचे, रामेश्वर विद्यालय यांच्यासह अनेकांचे बहुमोल सहकार्य लाभले.





फोटो ओळी :-
वारीत विविध क्षेत्रातील महिलांचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला.

फोटो०८:- वारी महिला दिन कार्यक्रम कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *