मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत १६ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील शेत/पाणंद रस्त्यांचा आराखडा तयार करून या रस्त्यांचा मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत २०२२/२३ च्या वार्षिक आराखड्यामध्ये समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठ्पुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने नुकतीच मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत २०२२/२३ च्या वार्षिक आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यामध्ये मतदार संघातील १४ गावातील १६ किलोमीटर रस्त्यांना मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या २०२२/२३ च्या वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील शेत-पाणंद रस्त्यांचा एकत्रित आराखडा तयार करून या रस्त्यांचा वार्षिक आराखड्यात समावेश होवून या रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी ना. आशुतोष काळे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्यातून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील १६ किलोमीटर रस्त्यांचा मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंत २०२२/२३ च्या आराखड्यामध्ये समाविष्ट करून मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये डाऊच बु.ते देर्डे चांदवड रोड ०२ किमी, मोर्वीस येथील सोपान जासुदार पगारे यांचे शेत ते गुलाब निवृत्ती सरडे यांचे शेत ०२ किमी, मल्हारवाडी ते मनेगाव रस्ता ०१ किमी, घारी ते हिंगणवेढे वस्ती जोड रस्ता ०१ किमी, वारी येथील चोंडीनाला ते ठोंबरे वस्ती ०१ किमी, धोत्रे ते लाख रस्ता ०१ किमी, मंजूर येथील राज्य महामार्ग ०७ ते शिवरस्ता ०१ किमी, उक्कडगाव आपेगाव रस्ता उक्कडगाव रोड ०१ किमी, कोळगाव थडी येथील खंडोबा वस्ती रोड बाळासाहेब चव्हाण शेत ते अशोक चव्हाण यांचे शेत ०१ किमी, तिळवणी उक्कडगाव रस्ता तिळवणी रोड ०१ किमी, मढी खु. येथील जि.प. शाळा वस्ती ते आण्णा सूर्यभान आभाळे घर ०१ किमी, धारणगाव ते सोनारी शिवरस्ता ०१ किमी, अंचलगाव ते बोलकी शिवरस्ता ०१ किमी, जेऊर पाटोदा गावठाण कोपरगाव रस्ता ०१ किमी या रस्त्यांचा समावेश आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंत २०२२/२३ च्या आराखड्यामध्ये १६ किमी शेत/पाणंद रस्त्यांना समाविष्ट केल्याबदल वरील सर्व गावातील नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील १६ किमी रस्त्यांना वार्षिक आराखड्यात समाविष्ट केल्याबदल ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे, रोजगार हमी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *