नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने शिवजयंतीच्या निमित्ताने जपली सामाजिक बांधिलकी:- राजेंद्र फड…

कोपरगाव

सामाजिक बांधिलकी जपत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने शिवजयंतीच साजरी

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वृद्धाश्रमात अन्नदान, फळ व ब्लॅंकेटचे वाटप तर मनोरंजनासाठी टीव्ही भेट

कोपरगाव प्रतिनीधी:-
(नाशिक):- शिवजयंतीच्या निमित्ताने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामनगाव येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप करत मनोरंजनासाठी टीव्ही भेट देण्यात आला. तर संत गाडगे महाराज आश्रमात वृद्धांना एकवेळचे भोजन दिले. प्रथमतः नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, सुनील बुरड, जयपाल शर्मा, सुलेमान सय्यद शंकरराव धनावडे, सुभाष जांगडा, दीपक ढिकले ,विजय लहामगे, तेजपालसिंग सोडा, बजरंग शर्मा ,दलजीतसिंग मेहता, संजय राठी, राजेश शर्मा ,किरण आव्हाड, सोनू शर्मा ,सतीश कलंत्री, शरद जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. शिवजयंतीच्या निमित्ताने बॅनरसह इतर गोष्टींवर होणार खर्च टाळून या खर्चातून दरवर्षी वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजन, फळवाटप यासह विविध उपक्रम राबवित उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी देखील सामनगाव येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप करत मनोरंजनासाठी टीव्ही भेट देण्यात आला. तर संत गाडगे महाराज आश्रमात वृद्धांना एकवेळचे भोजन देण्यात आले.
चौकट:-
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिवजयंतीच्या निमित्ताने बॅनरवर अनावश्यक खर्च न करता जमा होणाऱ्या निधीच्या माध्यमातून वृद्धाश्रमात भोजन, फळवाटपा सह आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात करण्यात येते. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रमातील नागरिकांना मनोरंजनासाठी टीव्ही भेट देण्यात आला.

-श्री.राजेंद्र फड, अध्यक्ष नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *