
कोपरगांव प्रतिनिधी:-
येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ईटीपी शुगर विभागाचे कर्मचारी बाळासाहेब दौलतराव शेटे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. संजीवनी साखर कामगार पतपेढीचे अध्यक्ष तर कोल्हे कारखान्यांच्या माती पाणी परिक्षणाचेही त्यांनी काम पाहिले होते. मनमिळावू, स्मितभाषी स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या पार्थीवावर दहेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. बाळासाहेब शेटे यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे, माजी उपाध्यक्ष त्रंबकराव सरोदे, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष विलास कुलकर्णी, डॉ गुलाबराव वरकड आदिंनी शोक व्यक्त केला.
