नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ व दादाजी भुसे यांच्याकडून विनम्र अभिवादन..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक,येवला):-

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.


यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार,भास्कर कोंढरे, मोहन शेलार,दिपक लोणारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *