कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पिवळे रेशन कार्ड वाटप:- तहसीलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सन्माननीय राज साहेब यांच्या प्रेरणेने व मनसे उपजिल्हा अध्यक्ष श्री संतोष भाऊ गंगवाल मनसे तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड मनसे तालुका मार्गदर्शक श्री सुनील भाऊ फंड यांच्या मार्गदर्शनाने कोपरगाव भर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे कोपरगाव शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे यांच्या प्रयत्नातून अंत्योदय पिवळे रेशन कार्ड वाटप कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार श्री योगेशजी चंद्रे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
.

यावेळी बोलताना तहसीलदार साहेब म्हणाले की अंत्योदय पिवळे रेशन कार्ड राहिल्या दिव्यांग बांधवांनी पण लवकरात लवकर काढून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले माननीय तहसीलदार साहेबांना सह नायब तहसीलदार सौ कुलकर्णी मॅडम पुरवठा विभागाचे श्री गायकवाड साहेब बिननोड साहेब काजळे साहेब काळणे साहेब तसेच सी एन आय चे पत्रकार श्री आमीन भाई शेख यांचा दोन्ही दिव्यांग संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजीत कालेकर कोपरगाव तालुका अध्यक्ष संदीप भाऊ शिरसागर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन जिल्हा संघटक परमेश्वर कराळे तालुकाध्यक्ष शरद खिल्लारी भाऊसाहेब पारखे हिरे सोनवणे ताई आदी अंत्योदय लाभार्थी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *