
कोपरगाव प्रतिनिधी:-
वंदनीय हिदुंह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रध्दास्थान दैवत बाळासाहेब केशवराव ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने , तसेच मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे ,नामदार अदित्य ठाकरे, यांच्या आशीर्वादाने , उत्तरनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील हनुमाननगर येथे स्वराज्य सेना शाखा क्र.५ व संत जर्नादन स्वामी हाँस्पीटलच्या वतिने २२ जानेवारी २०२२ रोजी मोफत सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरूवात आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतीमेचे पुजन करुन करण्यात आली.या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,एस.टी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे,,अस्लमभाई शेख कोपरगाव विधानसभा संघटक,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.या रोगनिदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन या शिबिरासाठी ३८० नागरिकांनी सहभाग नोदविला आहे.सध्या वातावरण खराब असल्याने कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना हाताला काम नाही.आर्थिक अडचणी मुळे नागरिक त्रस्त असल्याने या सर्व रोगनिदान शिबिराचा नागरिकांना दिलासा मिळाला आहे.या भागातील नागरिकांनी देखील शिवसेना, स्वराज्य सेना,शाखा क्र ५ व संत जर्नादन हाँस्पिटलचे आभार मानले आहे.या सर्व रोगनिदान शिबिरासाठी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल ,कोपरगाव विधानसभा संघटक अस्लमभाई शेख,बाळासाहेब सांळुके, योगेश उशिरे,विशाल झावरे,निलेश पवार,अक्षय सोळसे,गौरव रोकडे,अभिषेक भारस्कर,करण सोळसे,राहुल आवारे,गणेश धिवर,वाल्मीक गवारे,मनोज जोशी, सुमेश पंडोरे,आसिफ शेख,सुरेश गुजर,ऋतिक शिंदे,ऋषिकेश शिवदे,गौरव गुप्ता यांच्या सह श्री जनार्दन स्वामी महाराज हाॅस्पीटलचे संबधीत इतर कर्मचारी स्टाॅप कोपरगाव व. हनुमाननगर परीसरातील जेष्ठ पुरूषमंडळी व महिला माता भगिणी मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
