
कोपरगाव प्रतिनिधी:-
तुम्हाला हवा तो पुरस्कार मिळेल, त्यासाठी इंटरनेट ची मदत घ्या असे देवळाली प्रवरा येथील माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी त्यांच्या fb गावगाडा सदरात म्हंटले आहे..
गावगड्यात आज त्यांनी पुरस्कारावर भाष्य करताना ते म्हणतात की, आपण गांवगाडयात अनेक शासकिय योजनांचा अभ्यास करत आहोत. आज आपण राज्यशासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या पुरस्काराची माहिती घेवुन. कृषीभुषण पुरस्कार, उद्योगजक पुरस्कार, सावीत्रीबाई फुले पुरस्कार. डॅा बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, पुर्वीचा दलित मित्र पुरस्कार,संत रोहीदास पुरस्कार , कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार, महाराष्ट्र भुषण, विविध पद्म पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न, भारतरत्न.. असे एक ना अनेक पुरस्कार शासनाच्या विविध विभागाकडुन दिले जातात. त्यात रोख रक्कम, पुरस्कार वितरण स्थळी राज्याच्या पाहुण्याचा दर्जा, मोफत प्रवास, सन्मान चिन्ह, गणवेश, प्रशिस्तीपत्र, आदींचा समावेश असतो. शासनाच्या या शासकिय पुरस्कारां व्यतिरिक्त अनेक खासगी संस्था, व्यक्ती , क्लब मंडळे , ॲकेडमी आपल्या परिने पुरस्कारांचे आयोजन करतात. शासकिय पुरस्कार निवडताना शासनाचे नियम असतात. परंतु हे खासगी पुरस्कार घेताना त्या संस्थेस सर्वांथाने योग्य वाटतील अशी व्यक्ती वा संस्था ते आपलेपरिने शोधुन काढत गौरवांकित करत असतात. हे गौरव त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात केलेल्या कामांची पावती असते. त्यांचा गौरव म्हणजे त्यांनी समाजावर केलेल्या उपकारांतुन उतराई होण्याचा भाग असतो. अनेकजण पुरस्कार नाकारतात अथवा नम्रपणे याचे सर्व श्रेय यासाठी कारणीभुत ठरलेल्या घटकांना अर्पण करतात. मुळात तळागाळात काम करत राबणारे खुप घटक आहेत ते कसल्या पुरस्काराची अपेक्षा करत नाहीत किंवा त्यासाठी काम करत नाही. आपले कौतुक व्हावे, आपल्या कामांची पावती मिळावी असे वाटणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्यातुन शाबासकी, बक्षीशी, पुरस्कार याचां उगम झाला. तुम्हांलाहि वाटत असेल ना मला एखादा पुरस्कार का नको? तर, जरा नेटवर जा तुम्हांला जो हवा त्या पुरस्काराचे नांव लिहा… क्षणात तुमच्यासमोर येईल पुरस्काराचे स्वरुप, कश्यासाठी व का दिला जातो… कोण देतो… तुम्हांला मिळु शकतो का पहा.. करा प्रयत्न… देवळालीकरांनो सहज शक्य आहे… तो मिळुन आपली, न आपल्या कुटुंबाची, गावाची शान वाढवा… अन् काही मार्गदर्शन लागले तर आम्ही आहोतच…
गांवगाडा
दत्ता कडू पाटील
माजी सनदी अधिकारी
देवळाली प्रवरा
