

कोपरगाव प्रतिनिधी:-
महिला बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी किशोर आणि वैशालीची केले अभिनंदन.
दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी किशोर ढुस यांचे चुलते तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून किशोरचे व ढुस परिवाराचे अभिनंदन करून समाजाला दिशादर्शक निर्णय घेऊन एक विधवेचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन केले बद्दल ढुस परिवाराचे आभार मानले.
