
कोपरगांव प्रतिनिधी:-
शहरातील रस्त्यांची कामे चांगली व्हावी ही आपली तळमळ आहे, त्याप्रमाणे हेम मेडीकल ते एस.जी. विद्यालय, रोडचे कामाबाबत आपला सातत्याने पाठपुरावा सुरु आहे मात्र विरोधकांनी आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय फायद्यासाठी हेम मेडीकल ते एस.जी. विद्यालय या रस्त्याचे काम अडविले आहे काय, आमची जिरविण्यााचा नादात कोपरगाव शहरवासीयांची जिरवा_जीरवी सुरू आहे काय अशा आशयाचे पत्रक माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
ते म्हणाले की, हेम मेडीकल ते एस.जी विद्यालय या रस्त्याला काळे गटाचे दिग्गज नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. हा रस्ता वाहतुकीस अनेक ठिकाणी अडथळ्यांचा तयार झाला आहे, तेव्हा शहरातील नागरीकांनी या रस्त्याच्या कामाबाबत आपनाकडे सातत्याने मागणी केली आहे. या रस्त्याला विरोधकांचे धरमशेठ बागरेचा, नगरसेवक मंदार पहाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेविका वर्षा गंगुले, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, नगरसेवक मेहमुद सय्यद, अजिज शेख आदि मंडळी कार्यरत आहे, नव्हे तर हे विरोधकांचे पार्लमेंटरी बोर्डच आहे, एव्हढे असुनही या रस्त्याचे अद्यापही काम होत नाही, त्यामुळे अनेक नागरीकांनी हया रस्त्याचे कामाबाबत तक्रारी केल्या आहेत. खरोखरच शहरातील नागरीकांना सुविधा द्यायच्या असा विरोधकांचा सुर असेल तर मग या रस्त्याचे काम का अडविण्यांत आले आहे. नागरीकांना रस्ता महत्वाचा आहे, अडवा-अडवी नाही. तेंव्हा विरोधकांनी यात राजकारण न आणता या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा याविरुद्ध आंदोलन करावे लागेल, खोट्या प्रसिद्धी व प्रतिष्ठेसाठी रस्त्यावर मुरूम टाकावयाचा असे सांगून माती टाकणाऱ्यांना व रस्त्याची दलदल निर्माण करणाऱ्यांना जनता आगामी निवडणुकीत माफ करणार नाही असेही ते म्हणाले.
