
कोपरगाव प्रतिनिधी (नामपूर/सटाणा):- ऐन सणासुदीच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले असून प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.

बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखांची उद्घाटने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक सुनिल आहेर, तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुयोग आहिरे आदींची भाषणे झाली.
अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात अजूनही आक्रमक आंदोलने केले जातील असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या खिरमाणी येथील शाखेच्या अध्यक्षपदी दिनेश भदाणे तर श्रीपुरवडे येथील शाखेच्या अध्यक्षपदी वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
चौकट:-
केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळेच पेट्रोलने व डिझेलने प्रति लिटरला किंमतीचे शतक पार केले असून घरगुती गॅस हजाराच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाईचा भडका उडाला असून “महंगाई को लगातार बढानेवालो, जनता माफ नही करेगी” असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी दिला आहे.

बागलाण तालुक्यातील खिरमाणी व श्रीपुरवडे येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखांच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, माजी आमदार संजय चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक सुनिल आहेर, तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुयोग आहिरे, माहिती व तंत्रज्ञान सेलचे तालुकाध्यक्ष प्रीतीश भदाणे, नामपूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मेघदीप सावंत, चारुदत्त खैरनार, प्रसाद दळवी, नितीन काकडे, विशाल मांडवडे, महेश शेवाळे, राहुल भदाणे, धनंजय गांगुर्डे, महेंद्र भदाणे, राजेंद्र ठाकरे, सरपंच उज्वला डावरे, प्रविण भदाणे, डॉ.राकेश गोलाईत, पंडित भदाणे, आर.डी शेवाळे, पंडित मांडवडे, अमोल ठाकरे, राजू भदाणे, संतोष गांगुर्डे, महेश भदाणे, गणेश सगळे, हेमंत शिंदे, प्रकाश भदाणे, बाळासाहेब शेवाळे, नंदू भदाणे, विनेश भदाणे, रोशन भदाणे, रामदास शेवाळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


फोटो ओळी:- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखांची उदघाटन करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार समवेत माजी आमदार संजय चव्हाण, पुरुषोत्तम कडलग, शैलेश सुर्यवंशी, सुनिल आहेर, सम्राट काकडे, सुयोग आहिरे आदी दिसत आहेत.
