
कोपरगाव प्रतिनिधी:- जाणता राजा प्रतिष्ठानचा “समाजरत्न” पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच श्री.भास्करराव पेरे पाटील यांचे शुभहस्ते स्वच्छतादूत व पर्यावरणप्रेमी कोपरगाव भुषण श्री.सुशांतजी घोडके सर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला आहे.


जाणता राजा प्रतिष्ठान,भानसहिवरा ता.नेवासा वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील स्मरणार्थ सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कार वितरण प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास कोरडे, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील, यांचे सह विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर,भानसहिवरा व नेवासा ग्रामस्थ उपस्थित होते.
आजपर्यंत केलेल्या कार्याचा आदर्श भास्करराव पेरे पाटील सारखे योग्य व्यक्तीमत्वाचे हातून समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान झाल्याने समाधान व सार्थक वाटते.स्वच्छता,जलशक्ती,वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रात तन-मन-धनाने निरंतर कार्य करतांना सहभागी सर्व सहकारी, मार्गदर्शक अधिकारी, कर्मचारी,वन विभाग, सार्वजनिक वनीकरणात योगदान देणारे,सूर्यतेज संस्थेचे सदस्य, महाराष्ट्र हरितसेना,कोपरगाव,शिर्डी,राहाता,येवला वैजापूर, सिन्नर येथील वृक्षारोपण अभियानात सहभागी,लावलेले झाड जगवणारा वृक्षप्रेमी यांचा हा सन्मान आहे.समाजरत्न पुरस्कार हा प्रत्येक सार्वजनिक उपक्रमात साथ देणार्या कोपरगावकरांना समर्पित आहे.असे सूर्यतेज संस्थापक, स्वच्छतादूत व जाणता राजा प्रतिष्ठानचा समाजरत्न पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी व्यक्त केली आहे.
