

कोपरगाव प्रतिनिधी:- कॅन्सर उपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्यात सहकार्य करार करण्यात आला. एसएमबीटी हॉस्पिटल येथे @TataMemorial च्या तांत्रिक सहकार्यातून कॅन्सर सुविधा उपलब्ध झाल्या, माझ्यासाठी ही अत्यांनदाची बाब आहे.


टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे सरांच्या विशेष सहकार्यामुळेच हे शक्य झाले. त्यांच्याच हस्तेच आज हा सहकार्य करार करण्यात आला.राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती प्रेरणादायी होती, त्यांचा आशिर्वाद कायम सहकाऱ्यांचा उत्साह वाढवतो.
एसएमबीटीच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत असताना कॅन्सर सुविधा टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्यानेच दिल्या जाव्यात हे माझे स्वप्न होते. मला विश्वास आहे, आम्ही मानवतेच्या कल्याणासाठी अधिक ताकदीने काम करू.
या प्रसंगी उपस्थित असलेले टाटा मेमोरियलचे उपसंचालक डॉ.पंकज चतुर्वेदी,आ.डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार.
