महात्मा गांधींनी देशात लोकशाहीची बीजे रुजविली:- न्या. स. बा. कोऱ्हाळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी : महात्मा गांधींनी देशात लोकशाहीची बीजे रुजविली आहे. आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये गांधीजींचे योगदान वादातीत आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त “आजादीका अमृत महोत्सव” या उपक्रमाद्वारे कायद्याचे ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश स. बा. कोऱ्हाळे यांनी केले.
आज कोपरगाव सत्र न्यायालय येथे केंद्र सरकार,सर्वोच्च न्यायालय, विधी व न्यायविभाग महाराष्ट्र राज्य, जिल्हा व सत्र न्यायालय , दिवाणी वरिष्ठ व कनिष्ठ स्तर न्यायालय तसेच कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादीका अमृत महोत्सव” २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला आला आहे . त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश क्र. १ एम एस बोधनकर होते. व्यासपीठावर यावेळी न्या. श्रीमती एस एन सचदेव, न्या. व्ही. एन. मिसाळ, न्या. जे. एम पांचाळ न्या. आर. ए . शेख ,पो. नि. वासुदेव देसले , पो. नि. दौलतराव जाधव , गट विकास अधिकारी श्री.सूर्यवंशी , कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गोसावी , कोपरगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस, बी लोहकने ,सरकारी वकील अशोक वहाडणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व शासकीय विभागाकडून कोपरगाव न्यायालय ते महात्मा गांधी चौक अशी रॅली काढून तहसील कचेरी येथे विसर्जित करण्यात आली. न्या. कोऱ्हाळे पुढे म्हणाले कि सर्वसामान्य जनता न्यायालयात येण्यास घाबरते, याचे कारण त्यांचे कायद्याबद्दल असलेले अज्ञान आहे. या उपक्रमाद्वारे न्यायालयाबाबत असलेली भीती जाऊन जनतेची कायद्याची साक्षरता वाढणार आहे. तसेच त्यांच्या न्यायालयीन हक्क व तरतुती बाबत जागरूकताही वाढणार आहे. आपल्या महान संस्कृतीचे आपण गोडवे गात असतो मात्र असे असताना एखादी अबला स्त्री किंवा वृद्ध आईवडिलांना पोटगी मागण्यासाठी न्यायालयात यावे लागते याबाबत न्या. कोऱ्हाळे यांनी खंत व्यक्त केली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात न्या. एम एस बोधनकर म्हणाले कि “आजादीका अमृत महोत्सव” या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य जनतेचे न्यायालयीन प्रक्रियेबाबत प्रबोधन होणार आहे. तसेच ज्या व्यक्तींना न्यायालयीन व कायदेशीर मदतीची गरज आहे. त्यांना ती देण्याचा प्रयत्न केला जाईल . त्याकामी पंचायत समिती , नगर परिषद , तहसील कार्यालय , विधी महाविद्यालय तसेच वकील महासंघ यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

यावेळी सरकारी वकील ए दि टुपके, जेष्ठ विधीतज्ञ , जयंत जोशी , शंतनू धोर्डे ,एम ,पी गुजराथी , एम. पी. येवले, बी, एन गंगावणे , सौ. एस एम देशमुख , सौ. शीतल गायकवाड , अधीक्षक सुनील निसाळ ,सहा.अधीक्षक दहीफळॆ, वरिष्ठ लिपिक आनंद सोनपसारे , श्रीमती. परमजित मंटाला व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *