कोपरगाव शहर विकासासाठी पुन्हा ५ कोटी निधी मंजूर:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न व इतर प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावणार…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याचा सर्वागीण विकास करण्याचा ध्यास घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ५ कोटी निधी मंजूर केला असून आजपर्यंत कोपरगाव शहरासाठी दीडच वर्षात प्रतिकूल परिस्थितीत १२ कोटी रुपये निधी महाविकास आघाडी सरकारकडून मिळविला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

  कोपरगाव शहरांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे शहरवासियांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध विकास कामांना निधी मिळावा याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत नगरविकास मंत्रालयाने यापूर्वीच कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत तब्बल ५ कोटी रुपये निधी देवून यामध्ये धारणगाव रोड विकसित करणे २ कोटी, प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष, कोपरगाव शहरातील (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे १ कोटी, कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे ५० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी देखील दोन कोटी रुपये दिले असून पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तब्बल पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, शाळा दुरुस्ती, सभामंडप बांधणे, सिडी वर्क, कब्रस्थान,स्मशान भूमीच्या  विकास करून सोयी-सुविधा निर्माण करणे, सुशोभीकरन करणे आदी विकास कामांचा समावेश आहे.

              कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विविध विकास कामांना निधी मिळविण्यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येवून सदर प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरी देवून शहरातील अतिशय महत्वाच्या  विकासकामांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत पुन्हा एकदा ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.त्यामुळे बहुतांशी विकासकामे मार्गी लागणार आहेत. कोरोना संकटाच्या काळातही निधी मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे व त्या प्रयत्नांना  यशदेखील मिळत आहे. यापुढे देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजीतदादा पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विकासकामांची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

चौकट :- कोपरगाव शहराच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच शहर विकासाचे प्रश्न देखील सोडविण्याचे वचन दिले आहे. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जनतेचे आशीर्वाद पाठीशी असून महाविकास आघाडी सरकारचे देखील अनमोल सहकार्य मिळत असल्यामुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळत आहे. यापुढेही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्याने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच इतर प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावणार आहे – आमदार आशुतोष काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *