दि कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशन यांच्या वतीने हॉलमार्क संदर्भातील किचकट अटी संदर्भात तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- केंद्र शासनाने सोने शुध्दतेचे हॉलमार्कींग करण्यास बंधनकारक केलेले आहे ह्या अत्यंत किचकट प्रणाली तयार केलेली आहे. यामध्ये लहान व्यापार्यांचा कुठल्याही प्रकारे विचार केलेला नाही व आमच्या सराफ व सुवर्णकार बांधवांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. क्वालिटी कंट्रोलसाठी हॉलमार्क कायदा गरजेचा आहे त्याचे आम्ही स्वागत करतो पण HUID प्रणाली ही अत्यंत किचकट आहे त्याचा आम्ही विरोध करतो HUID मुळे कोणालाही फायदा होणार नाही पण सराफ व सुवर्णकार यांच्या व्यवसायावर निर्बंध व दुष्परिणाम आणणारा आहे क्वालिटी कंट्रोल साठी हा दागिना कोणी बनवला? कुठे बनवला ? किती रुपयांना विकला ? कोणाला विकला ? याचे हिशोब ठेवणे नक्कीच गरजेचे नाही तरी HUID प्रणाली रद्द करण्यात यावी हि विनंती असे दिलेल्या निवेदनात लिहीले आहे.

तहसीलदार साहेब यांना निवेदन देताना यावेळी दि कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशन चे अध्यक्ष योगेश बागुल, उपाध्यक्ष चंद्रकांत उदावंत , सेक्रेटरी मनोज कपोते , सह.सेक्रेटरी सुनिल मोरे , खजिनदार संजय उदावंत , अमित पोरवाल , दिपक विसपुते , तुळशीदास खुबानी, अरुण उदावंत, क्रुष्णा उदावंत, संदिप कपिले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *