गौतम पब्लिक स्कुलचा एसएससी परीक्षा २०२१ चा निकाल १००%,परंपरा कायम..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुलने यावर्षी देखील आपली १००%निकालाची परंपरा कायम ठेवली आहे अशी माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
एप्रिल२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ऑनलाइन नुकताच जाहीर झाला असून गौतम पब्लिक स्कूल ने याहीवर्षी उज्वल निकालची परंपरा कायम राखली आहे. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे ९१%च्या वर १७, ७५% ते ९०% मध्ये – ७५तर ६०% ते ७४% मध्ये ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. यावर्षी मानांकनामध्ये मुलींनी थेट बाजी मारली असून यामध्ये उज्वल यशाचे पाहिले पाच मानकरी पुढीलप्रमाणे १)निधि सुभाष भारती – ९९.४०%,२) वैष्णवी प्रकाश बोरनर -९६.२०%,३) पोळ रितेश सुनील -९५.८०%, चौथे येणारे तीन मानकरी ४) बिडवे विवेक ज्ञानेश्वर-९५.२०%,४) सानप जानवी संदीप-९५.२०%,४) चव्हाण साई गोरक्षनाथ-९५.२०%,५) खेडकर योगेश संजय -९४.६०% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, शाळेचे सर्व इ.१० वी च्या शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन माजी आम. अशोकरावजी काळे, कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे तसेच सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *