कोरोना नियंत्रणासाठी शिंगणापूर ग्रामपंचायत ने राबविला स्थुत्य उपक्रम..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना नियंत्रणासाठी शिंगणापूर ग्रामपंचायत ने राबविला स्थुत्य उपक्रम माननीय तहसीलदार श्री. योगेशजी चंद्रे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे व गट विकास अधिकारी श्री. सचिन सुर्यवंशी साहेब यांच्या सहकार्याने शिंगणापूर ग्रामपंचायत ने कोपरगाव औद्योगिक वसाहती चे चेअरमन व जिल्हा बँकेचे संचालक माननीय विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर गाव व परिसरातील किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, बँक कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी व इतर व्यावसायिक तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यासाठी कोरोना चाचणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले

होते. सदर कॅम्पमध्ये एकूण 106 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे आणि 87 जणांचे घश्याचे श्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे.

सदर कॅम्पला कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव देसले साहेब आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी भेट देऊन पाहणी केली व सदर उपक्रम राबविले बद्दल सरपंच सौ. सुनिता भीमराव संवत्सरकर, पोलीस पाटील सौ. सविता प्रशांत आढाव व ग्रामविकास अधिकारी श्री जगन्नाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. सदर कॅम्प राबविणे कामी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, कर्मचारी पवन गिते, कुणाल संवत्सरकर, सुरज आजगे, आरोग्य सेविका वंदना धनवटे मॅडम, आरोग्य सेवक सुभाष महाजन, संजय चौधरी, आशा सेविका नीता भोसले, वैशाली उंडे, लॅब टेक्निशियन आकाश आरने आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *