Uncategorized

कोपरगाव तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीबाबत आ. विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या कोरडा दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, नागरिक आणि पशुधनासमोरील संभाव्य अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज, २२ सप्टेंबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आ. विवेक कोल्हे यांनी पूर्वी प्रशासनाकडे पत्राद्वारे परिस्थितीबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती त्यावर चर्चा करून सद्यस्थितीमध्ये कराव्या लागणाऱ्या उपाययोजना कोल्हे यांनी सुचवल्या.प्रांताधिकारी धनंजय बांगर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
गाव निहाय पाणीटंचाईचे नियोजन करावे. आवश्यक विहिरी अधिग्रहित कराव्या,आवश्यक तेथे गाळ काढणे खोलीकरण याची कामे करावीत.जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, पशुधनाचे अद्यावत आकडेवारी घेऊन त्यावर कार्यवाही करावी.विजेच्या समस्येबाबत पीटर सेपरेशनचा डीपीआर तयार झालेला आहे लवकरच त्याला मान्यता मिळेल त्यामुळे घरगुती लाईट २४ तास आपल्या उपलब्ध होईल व शेतीसाठी देखील लाईट उपलब्ध होणार आहे यासाठी आ.विवेक कोल्हे यांनी सूचना केल्याप्रमाणे कार्यवाही होणार आहे असे प्रशासनाने सांगितले.पाट पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जलसंपदा अधिकाऱ्यांना कोल्हे यांनी दिले. कोणतीही चारी बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. १ जानेवारी २०११ पर्यंतचे निवासी प्रयोजनार्थ केलेली सर्व अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी शासनाने स्वतःहून कार्यवाही करावी त्याची जनजागृती करावी व सर्व अतिक्रमण नियमा कुल करावे असे निर्देश प्रशासनाला दिले यावेळी दिले.

यासह आ. विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांची सद्यस्थिती, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना संभाव्य आर्थिक नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याच्या सूचना केल्या. महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य, पशुसंवर्धन, जलसंपदा व संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा अहवाल तातडीने तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासह इ पिक पाहणीची प्रक्रिया शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक पूर्ण करण्याकडे भर द्यावा आवाहन केले.

तालुक्यातील ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे, तेथील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना निश्चित कराव्यात. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता राहावी आणि शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळ निवारण योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीस आ.आशुतोष काळे,गटविकास अधिकारी संदीप वाळुंज,मुख्याधिकारी अजित निकत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप, सा. बांधकाम तुळशीराम दहिफळे,एम एस इ बीचे विजय बोरसे,गोदावरी डावा कालव्याचे संदीप पाटील, पशुधन अधिकारी काटे मॅडम, डॉ. दहे कोपरगाव ग्रामीण व शहरचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ट्रिगर १ प्रमाणे पाऊस,पावसातील तृट, पावसातील दीर्घ खंड यामुळे पिकांची स्थिती, पेरणी लागवड,मातीतील ओलावा, भूजल पातळी याची स्थिती आपल्याकडे दिसते आहे त्यावर तालुक्यातील परिस्थितीचा विभागनिहाय आढावा घेऊन शेतकरी व नागरिकांना आवश्यक मदत आणि उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *